जिल्हा क्रीडा पुरस्कारसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

नांदेड दि. 7 नोव्हेंबर : आयुक्त, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नांदेड यांच्यामार्फत नांदेड जिल्हयात दरवर्षी जिल्हा क्रीडा पुरस्कार वितरीत करण्यात येतो. जिल्हयातील गुणवंत क्रीडा मार्गदर्शक व गुणवंत खेळाडू पुरुष, महिला व दिव्यांग यांनी केलेल्या कार्याचे/ योगदानाचे मूल्यमापन व्हावे त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा. त्यांच्यापासून इतरांनी प्रेरणा घ्यावी या हेतून जिल्हा क्रीडा पुरस्कार देण्यात येतो. जिल्हयातील खेळाडू, मार्गदर्शक यांच्याकडून सन २०२४-२५ या एका वर्षातील पुरस्काराकरीता अर्ज मागविण्यात येत आहेत.

पुरस्कार प्राप्त करण्याकरीता केलेली कामगिरी ही त्या-त्या वर्षातील दिनांक ०१ जुलै ते ३० जुन दरम्यानचा कालावधी गृहीत धरण्यात येणार आहे. पुरस्कार संख्या- गुणवंत क्रीडा मार्गदर्शक-1, गुणवंत खेळाडु (पुरुष-1, महिला-1, दिव्यांग-1) पुरस्काराचे स्वरुप हे प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह व रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

मार्गदर्शक हा मागील १० वर्षात किमान वरीष्ठ गटातील राज्य व राष्ट्रीय पदक विजेते तसेच कनिष्ठ शालेय, ग्रामीण व महिला (खेलो इंडिया) मधील राष्ट्रीयस्तरापर्यंतचे पदक विजेते खेळाडू तयार केले असतील असा क्रीडा मार्गदर्शक जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज करण्यास पात्र राहील.

गुणवंत खेळाडू पुरस्कारासाठी मागील ०५ वर्षातील उत्कृष्ठ ठरणारी ०३ वर्षाची कामगिरी ग्राहय धरण्यात येईल. क्रीडा मार्गदर्शकाकरीता- सांघीक अथवा वैयक्तिक मान्यता प्राप्त क्रीडा प्रकारात नॅशनल गेम्स, वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत प्रतिनिधीत्व केलेला खेळाडू अथवा राज्य/ जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेत प्रथम तीन क्रमांकापर्यंत यश मिळविणारे किमान तीन खेळाडू घडविणारा मार्गदर्शक, तसेच क्रीडा मार्गदर्शकांनी खेळाडूस किती वर्षे प्रशिक्षण दिले याचेही तुलनात्मक मुल्यमापन करण्यात येणार आहे. अर्जदाराने मार्गदर्शन केलेल्या खेळाडूचे विहित नमुन्यातील हमीपत्र अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.

खेळाडु पुरस्कार करीता पात्र क्रीडा प्रकार- ॲथलेटिक्स, बॅडमिंटन, आर्चरी, बास्केटबॉल, कयाकिंग/ कनोईंग, सायकलिंग, क्रिकेट, तलवारबाजी, हॉकी, फुटबॉल, जिम्नॅस्टिक्स, हॅन्डबॉल, बॉक्सिंग, गोल्फ, पॉवरलिफ्टींग, हॉर्स राईडींग, लॉन टेनिस, नेमबाजी, स्विमींग (जलतरण) ड्रायव्हिंग, वॉटर पोलो, ट्रायथलॉन, बॉडीबिल्डिंग, ज्युदो मॉडर्न पेन्टॉथ लॉन, रग्बी, रोईंग, स्पोर्ट्स क्लाइंबिंग, स्क्वॅश, टेबल टेनिस, तायक्वाँदो, व्हॉलीबॉल, वेटलिफटींग, कुस्ती, स्केटींग, वुशू, कॅरम, सॉफ्टबॉल, बेसबॉल, कबड्डी, खो-खो, मल्लखांब, आटयापाटया, बुध्दीबळ, बिलियर्डस ॲन्ड स्नुकर, याटींग इत्यादी खेळाचा समावेश करण्यात आला आहे. इच्छुक खेळाडू व मार्गदर्शक यांनी आपले विहित नमुन्यातील अर्ज 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल, इनडोअर हॉल, नांदेड येथे सादर करण्यात यावे.

विहीत कालावधीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, कृपया याची नोंद घ्यावी व जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी समितीने घेतलेला निर्णय अंतिम राहील. अधिक माहितीसाठी व अर्ज प्राप्त करण्याकरीता कार्यालयातील राज्य क्रीडा मार्गदर्शक बालाजी शिरसीकर (मो.क्रं.7517536227) यांच्याशी संपर्क साधावा, असे जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी कळविले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या