मुंबई येथील उद्योगपती रवी कोयले यांची बार्शी तालुक्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना रब्बी पेरणीसाठी मदत
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : सप्टेंबर 2025 मध्ये बार्शी तालुक्यातील अकरा महसूल मंडळांत तीन ते चार वेळा अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे अतोनात नुकसान झाले होते. सदर नुकसानीचे पंचनामे तालुका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले होते. सदर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची कार्यवाही सुरू आहे.
शिक्षणानंतर मुंबई येथे बांधकाम व्यावसायिक क्षेत्रामध्ये कार्यरत रवी कोयले यांनी गावाची व शेतीची नाळ कायम ठेवत अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत म्हणून बार्शी तालुक्यात मौजे खडकलगाव व मुंगशी आर या गावामध्ये प्रत्यक्ष शेतकऱ्यांची भेट घेऊन 80 ते 100 शेतकऱ्यांना प्रत्येकी एक पोते युरिया, एक एकर ज्वारी पेरणी साठी लागणारे बियाणे , व कीडनाशक म्हणून लागणारी इमामे क्टिन बेंजोएट हे कीटकनाशक देऊन शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याचे काम केले आहे. या कार्यक्रमाच्या वेळी सर्वांनी परिस्थिती लक्षात घेऊन कोणीही खचून जावू नये व आवश्यकता वाटल्यास यापुढेही शेतकऱ्यांना मदत करणार असल्याचे सांगितले.
रवी नामदेव कोयले उद्योगपती मुंबई मूळचे रहिवाशी शेडशिंगे ,वैभव कोयले उपसरपंच शेडशिंगे पांडुरंग गायकवाड, तालुका कृषी अधिकारी संतोष कोयले कृषी अधिकारी प्रसन्नजीत जानराव , सयाजी गायकवाड ,अतुल जगताप , कृष्णा शेळके, सुहास साठे, सौ रेणुका दराडे , खडकलगावचे सरपंच दीपक रोंगे व मुंगशी आर येथे उपसरपंच संतोष कुरुंद व बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.




