भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचे स्मारक उभारणार विकास निधीला कमतरता पडणार नाही – पालकमंत्री डॉ. उदय सामंत
B1न्यूज मराठी नेटवर्क
रत्नागिरी, दि. 27 : देशातून रत्नागिरीमध्ये भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचे स्मारक पाहायला येतील. अशा पध्दतीचे भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचे स्मारक उभारले जाईल. असे सांगतानाच रत्नागिरीच्या विकासासाठी आवश्यक तेवढा निधी दिला जाईल. त्यात कुठेही कमतरता पडू देणार नाही, असेही पालकमंत्री डॉ. उदय सामंत म्हणाले.
रत्नागिरी नगरपरिषद पर्यटन स्थळ विकासासाठी मुलभूत सुविधांकरिता अनुदान अंतर्गत शहरातील श्री विठ्ठल मंदीर परिसर सुशोभिकरण कामाचा प्रारंभ पालकमंत्री डॉ. सामंत यांच्या हस्ते आज करण्यात आला. याप्रसंगी मंदिराचे विश्वस्त आनंद मराठे, विजय पेडणकर, राहुल पंडित, बिपीन बंदरकर, बंड्या साळवी, राजू तोडणकर, प्रमोद रेडीज, मुन्ना सुर्वे, शिल्पाताई सुर्वे आदी उपस्थित होते.
पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले, या मंदिराला तीन कोटी रुपये उपलब्ध करुन देता आले. एवढा माझ्यासारखा भाग्यवान लोकप्रतिनिधी कोणी नसेल. हे काम पूर्ण करण्याची जबाबदारी नगरपालिका आणि ठेकेदार घेतील. हा कार्यक्रम महाराष्ट्रातल्या प्रत्येक वारकऱ्यांपर्यंत पोहोचलेला आहे. शिवसृष्टी झाल्यापासून आतापर्यंत एक लाख वीस हजार पर्यटकांनी शिवसृष्टी बघितली. देशातलं अरबी समुद्राच्या बाजूचे पहिले छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक जर कुठे असेल तर रत्नागिरीमध्ये आहे. हे देखील सांगताना मला मनापासून चा आनंद होतो आणि हा देखील एक पर्यटनात्मक विकास आपल्या लक्षात येईल.
देशातलं अंडरआर्म पहिलं क्रिकेटचं स्टेडियम जर कुठे होत असेल तर ते देखील रत्नागिरीमध्ये होतंय. या स्टेडियमला कान्होजी आंग्रे यांचे नाव दिले जाईल. देशातलं सगळ्यात चांगलं बौद्ध विहार बांधण्याचा निर्णय तुमच्यासारख्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी घेतला. ज्यावेळी त्याचं उद्घाटन होईल ते बौद्ध विहार म्हणूनच होईल. हे देशातलं शासनाने बांधलेले बौद्ध विहार असेल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने 289 नगरपालिकांमध्ये नमो उद्यान करण्याचा निर्णय घेतला. त्याच्यातलं नाविन्यपूर्ण उद्यान रत्नागिरी शहरांमध्ये होत आहे.
1 कोटी रुपये खर्चून दिव्यांगांसाठी होत आहे. आपल्याला दिलेला शब्द आणि जे जे सांगितलं ते करण्याचा प्रमाणिकपणाचा प्रयत्न माझ्यासारख्या कार्यकर्त्यांने केलेला आहे. परमेश्वराच्या मनामध्ये आहे की त्याला अपेक्षित असलेलं काम हे माझ्याकडून करून घ्यावं म्हणूनच विठ्ठल मंदिराचा कार्यक्रम होतोय. हे देखील ऐतिहासिक काम आहे. पुढच्या एकादशीपर्यंत हे मंदिराचे पूर्ण होईल. सर्वांनी विकासासाठी सांघिकपणे झटले पाहिजे असेही पालकमंत्री म्हणाले. मयेकर यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. जितेंद्र विचारे यांनी प्रास्ताविकेत सुशोभिकरणाबाबत सविस्तर माहिती दिली.




