‘अक्षरांची रांग’ शांता शेळके साहित्य गौरव पुरस्काराने बार्शीचे जेष्ठ साहित्यिक रामचंद्र इकारे सन्मानित
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : येथील कवी कालिदास मंडळाचे अध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक रामचंद्र इकारे यांना त्यांच्या ‘अक्षरांची रांग’ या ललित लेखसंग्रहासाठी कवयित्री शांता शेळके प्रतिष्ठान, मंचर ता.आंबेगाव जि. पुणे या संस्थेच्या वतीने शांता शेळके साहित्य गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
89 व्या अ. भा.मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व ज्येष्ठ विचारवंत डॉ.श्रीपाल सबनीस यांच्या शुभहस्ते सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, शॉल देऊन सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी हुलवळे, बबनराव पाटील ,संयोजक दत्तात्रय पायमोडे ,सौ.ललिता सबनीस, निवेदिका स्नेहल भोर आदी मान्यवर उपस्थित होते.
इकारे यांच्या ‘माणुसकीचे आभाळ’ या काव्यसंग्रहास व ‘अक्षरांची रांग’ या लेखसंग्रहास राज्यातील अनेक साहित्य संस्थांनी सन्मानित केले आहे. अक्षरांची रांग या लेखसंग्रहातील लेखांचे अभिवाचन राज्यभरातील अनेक नामवंत साहित्यिक, नाट्यकर्मी, चित्रकार करीत असून याही उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. त्यांच्या या यशाबद्दल कवी कालिदास मंडळ, म. सा. प शाखा बार्शी या साहित्य संस्थांतील अनेकांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.




