पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते पाणी पिऊन विजय चव्हाण यांनी सोडले उपोषण
B1न्यूज मराठी नेटवर्क
जालना, दि.25 : बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी विजय चव्हाण हे जालना येथे आमरण उपोषणाला बसले होते.
त्याअनुषंगाने आज राज्य सरकारच्या शिष्टमंडळ राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री तथा पालकमंत्री पंकजा मुंडे आणि मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी चव्हाण यांची भेट घेवून त्यांच्या मागण्याबाबत सविस्तर चर्चा केली.
यावेळी शिष्टमंडळाने उपोषणककर्ते विजय चव्हाण यांच्या मागण्यांवर सकारात्मक मार्ग काढण्याचे आश्वासन दिले. तसेच त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्यानंतर पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते चव्हाण यांनी पाणी पिऊन आपले आमरण उपोषण स्थगित केले. यावेळी आमदार अर्जन खोतकर यांच्यासह आदी मान्यवरांची उपस्थिती होती.




