बार्शी जनता टाइम्स दिपावली विशेषांक 2025 चे प्रकाशन संपन्न
उञेश्वर देवस्थानचे सरपंच दिनेशसिंह परदेशी यांच्या हस्ते प्रकाशन
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : बार्शी जनता टाइम्स दिपावली विशेषांक 2025 या 31 व्या अंकाचे प्रकाशन उञेश्वर देवस्थानचे सरपंच दिनेशसिंह परदेशी यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी बार्शी बाजार समितीचे माजी उपसभापती कुंडलिकराव गायकवाड, संचालक रावसाहेब मनगिरे, सामाजिक कार्यकर्ते अजित कुंकूलोळ, अभिजीत सोनिग्रा, बाळासाहेब तातेड, बालाजी फरतडे, राहूल बारंगुळे उपस्थित होते.
या प्रसंगी संपादक संतोष सुर्यवंशी म्हणाले की, सन 1994 मध्ये सुरू केलेल्या बार्शी जनता टाइम्सने स्थानिक स्तरावर सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक तसेच जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे कार्य सातत्याने केले आहे. या प्रवासातील प्रत्येक वर्षीचा दिपावली विशेषांक वाचकांसाठी ज्ञान आणि माहितीचा सोहळा ठरला आहे.
यंदाच्या अंकाचे प्रकाशन बार्शी तालुक्यातील राजकारणात पडद्यामागून किंगमेकर म्हणून भुमिका बजावलेले, बार्शीच्या सामाजिक क्षेञास कायम मदत करणारे आणि बार्शी जनता टाइम्स ला सतत 31 वर्ष जाहिरात हा प्रेमाचा ओलावा त्याचमुळे दिनेशसिंह परदेशी यांच्या हस्ते करण्यात येत आहे. यावेळी दिनेशसिहं परदेशी म्हणाले, “संतोष सुर्यवंशी यांचा सर्वत्र संचार नारदाप्रमाणे आहे. चांगल्या कार्याचा ते नेहमीच गौरव करतात. त्यांच्या कामाची व्याप्ती सर्व पक्षात आणि सर्व स्थरात आहे, बार्शी जनता टाइम्सच्या उपक्रमांना मी सदैव पाठीशी राहीन.”
या विशेषांकात मागील वर्षातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा, अतिवृष्टी व हवामान बदलाचे स्थानिक परिणाम, तसेच साहित्य, कला आणि लोकजीवनावर आधारित विशेष लेख वाचकांसाठी सादर करण्यात आले आहेत. यावेळी पत्रकार सर्वश्री धैर्यशील पाटील, संजय बारबोले, चद्रंकांत करडे, गणेश भोळे, विजय शिंगाडे, शाम थोरात, प्रशांत खराडे, मुद्रक सचिन आजबे आदि उपस्थित होते.




