बाशी शहर पोलिसांची दमदारी कामगिरी ! बार्शी शहर पोलिसांकडून ₹ ३२,३०,००० मुद्देमाल जप्त, आंतरजिल्हा वाहन चोरी टोळीतील आरोपीला अटक

0

एकूण ०६ कुबोटा ट्रॅक्टर, ०१ ब्लोअर व ०१ मोटारसायकल

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी (सोलापूर): बार्शी शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने वाहन चोरीच्या एका गुन्ह्याचा तपास करताना आंतरजिल्हा स्तरावरील वाहन चोरीच्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी एकूण सात वाहने (सहा ट्रॅक्टर, एक मोटारसायकल आणि एक ब्लोअर) असा सुमारे ३२ लाख ३० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून दोन आरोपींना अटक केली आहे.

बार्शी शहरातील नाईकोडी प्लॉट, उपळाई रोड येथील फिर्यादी यांची हिरो कंपनीची काळ्या रंगाची स्प्लेंडर मोटारसायकल १३ ऑक्टोबर २०२५ रोजी त्यांच्या घरासमोरून चोरीला गेली होती. या प्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ८४१/२०२५ अन्वये भारतीय दंड संहिता (BNS) कलम ३०३ (२) अंतर्गत १६ ऑक्टोबर २०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्याचा तपास पोहेकॉ/488 प्रविण साठे यांच्याकडे सोपवण्यात आला होता.

पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली १६ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री १९/३० वाजता पोहेकॉ/४८८ प्रविण साठे, पोहेकॉ/१६६७ अमोल माने, पोकॉ/१८६० अजीज शेख, पोकॉ/१९७४ सचिन देशमुख, पोकों/२०० राहुल उदार आणि पोकों/२१११ अंकुश जाधव यांनी बार्शी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग सुरू केले. याच दरम्यान, रात्री २३/१० वाजण्याच्या सुमारास गाडेगाव चौकात एक व्यक्ती संशयास्पदरीत्या ट्रॅक्टरसह उभी असलेली आढळली. त्या व्यक्तीकडे विचारणा केली असता, त्याने आपले नाव वैभव ज्ञानेश्वर फंड (वय २९ वर्षे, रा. सावरगाव काठी, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) असे सांगितले. त्याच्याकडील ट्रॅक्टरबाबत विचारणा केली असता, त्याने सदर ट्रॅक्टर माळुंब्रा (ता. तुळजापूर, जि. धाराशिव) येथून आपला मित्र संजय जगन्नाथ शिरगिरे याच्यासह चोरी केल्याचे कबूल केले. पुढील चौकशीत त्याने आणि त्याच्या मित्राने १३ ऑक्टोबर २०२५ रोजी बार्शी शहरातील उपळाई येथून एक मोटारसायकल तसेच धामनगाव, राळेरास, मुंगशी (ता. बार्शी, जि. सोलापूर) आणि माळुंब्रा (ता. तुळजापूर, जि. धाराशिव) येथून एकूण सहा ट्रॅक्टर आणि एक ब्लोअर चोरी केल्याची कबुली दिली.

या तपासादरम्यान पोलिसांनी आरोपींकडून एकूण ०६ कुबोटा ट्रॅक्टर, ०१ ब्लोअर आणि ०१ मोटारसायकल असा सुमारे ३२ लाख ३० हजार रुपये किमतीचा चोरीचा मुद्देमाल जप्त केला. या गुन्ह्याशी संबंधित खालील पोलीस ठाण्यांमध्ये फिर्यादी दाखल आहेतः

१. तामलवाडी पोलीस ठाणे, जि. धाराशिवः गु.र.नं. १४४/२०२५ आणि गु.र.नं. ४१/२०२५, BNS कलम ३०३ (२))

२. वैराग पोलीस ठाणे, जि. सोलापूरः गु.र.नं. 223/2025 आणि गु.र.नं. 249/2025, BNS कलम 303(2)

३. सोलापूर तालुका पोलीस ठाणे, जि. सोलापूरः गु.र.नं. 425/2025, BNS कलम 303 (2)

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रियत यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक सायकर आणि पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी पार पडली. यात पोसई उमाकांत कुंजीर, पोहेकॉ/1667 अमोल माने, पोहेकॉ/488 प्रविण साठे, पोहेकॉ/164 बाळकृष्ण डबडे, पोकॉ/1860 अजीज शेख, पोकॉ/1974 सचिन देशमुख, पोकॉ/2111 अंकुश जाधव, पोकॉ/200 राहुल उदार, पोकॉ/787 पवार, पोकॉ/1195 नितीन, पोकॉ/595 बहिरे, पोकॉ/1504 उघडे, पोकॉ/918 भांगे, पोकॉ/948 जाधवर आणि चापोकॉ/1949 मस्के यांनी मोलाची कामगिरी बजावली. पुढील तपास पोहेकॉ/488 प्रविण साठे करत आहेत.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या