ऑनलाइन फसवणुकीचा वाढता कहर : सोलापूर जिल्ह्यात १५२० नागरिकांची तक्रार

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

सोलापूर : ऑनलाइन व्यवहार, गुंतवणूक, नोकरी, लॉटरी अशा विविध आमिषांखाली होत असलेल्या ऑनलाइन फसवणुकीच्या घटना सोलापूर जिल्ह्यात झपाट्याने वाढत आहेत. लोकमतकडून मिळालेल्या माहितीनुसार, जानेवारी ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत तब्बल ७३५ प्रकरणांमध्ये पाच कोटी रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे.

जिल्हा सायबर पोलीस ठाण्याकडे या कालावधीत एकूण १५२० तक्रारी दाखल झाल्या असून, त्यात बँकिंग व्यवहार, मोबाईल अॅप्स, सोशल मीडियावरून फसवणूक आणि नोकरीचे आमिष दाखवून पैसे उकळण्याच्या घटना आघाडीवर आहेत.

सायबर तज्ञांच्या मते, फसवणुकीपासून बचावासाठी नागरिकांनी अनोळखी लिंकवर क्लिक न करणे, वैयक्तिक माहिती शेअर न करणे आणि संशयास्पद कॉल किंवा मेसेज आल्यानंतर त्वरित सायबर हेल्पलाइन 1930 वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या