राज्यस्तरीय आदर्श शिक्षक व जिल्हास्तरीय उपक्रमशील शाळा पुरस्कार कार्यक्रम दि.25 ऑक्टोबर रोजी होणार
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : ओन्ली समाजसेवा बहुउद्देशीय संस्था, बार्शी जि. सोलापूर या संस्थेच्या वतीने दिनांक 28 सप्टेंबर 2025 रोजी होणारा पूर्वनियोजित कार्यक्रम अतिवृष्टीमुळे स्थगित करण्यात आला होता. सदरचा कार्यक्रम शनिवार दि.25 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 10 वा. सौ.अंजली प्रशांतसिंह मरोड मॅडम (उपजिल्हाधिकारी, सोलापूर) यांच्या अध्यक्षतेखाली व विशाल गरड (प्रसिद्ध वक्ते,बार्शी) बालाजी कुकडे साहेब (पोलीस निरीक्षक, बार्शी), अजित दादा कुंकूलोळ (प्रदेश उपाध्यक्ष, व्हाईस ऑफ मीडिया), सतीश अंधारे (साई डेव्हलपर्स बार्शी) किशोर पडवळ (सुभेदार), शशांक गुगळे ( चांदमल ज्वेलर्स अमोल येवनकर (उद्योजक, बार्शी) व.अमृतनाना राऊत (अध्यक्ष, माऊली उद्योग समूह,बार्शी) या प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत माऊली लॉन्स, रेल्वे स्टेशन रोड, बार्शी जि.सोलापूर या ठिकाणी संपन्न होणार आहे. तरी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन राहुल वाणी संस्थापक अध्यक्ष यांनी केले आहे.




