दिवाळीनिमित्त देवगाव (मा.) येथील पूरग्रस्त कुटुंबांना साडी व धान्य किट वाटप
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : दिंडोरी स्वामी समर्थ ग्रामअभियान, बार्शी अंतर्गत देवगाव (मा.) येथील पूरग्रस्त कुटुंबांना दिवाळीनिमित्त साडी व धान्य किटचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाचे आयोजन दिंडोरी स्वामी समर्थ केंद्र ग्रामअभियान, बार्शी मार्फत करण्यात आले.
या वाटपाचा कार्यक्रम ग्रामअभियानचे प्रतिनिधी दिलीप घाटेराव आणि सौ. पुष्पा घाटेराव यांच्या हस्ते संपन्न झाला. या प्रसंगी मेजर प्रदीप मारकड तसेच गावातील अनेक ग्रामस्थ, महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमामुळे पूरग्रस्त कुटुंबांना सणाच्या काळात दिलासा मिळाला असून, ग्राम अभियानच्या कार्याचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे. समाजातील अशा संवेदनशील कार्यामुळे सामाजिक ऐक्य आणि माणुसकीची भावना दृढ होते, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.




