१० लक्ष लिटर्स क्षमतेच्या नवीन पाण्याच्या टाकीचे लोकार्पण आमदार राजाभाऊ राऊत यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी नगर परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्र सुजल निर्मल अभियान अंतर्गत, बार्शी शहर पाणीपुरवठा योजनेतील एक भाग असलेल्या, सुभाष नगर भागातील ताडसौंदणे रोड वरील बी.आय.टी. इंजिनीअरींग कॉलेजच्या पाठीमागील बाजूस नव्याने उभारण्यात आलेल्या १० लक्ष लिटर्स क्षमतेच्या पाण्याच्या टाकीमध्ये, सुभाष नगर येथील पाण्याच्या हौदाजवळील पंप गृह येथून पाणी सोडण्यात येऊन, त्याचे लोकार्पण आमदार राजाभाऊ राऊत यांच्या शुभहस्ते करण्यात आले.नव्याने उभारण्यात आलेल्या या उंच पाण्याच्या टाकीमधून बार्शी शहरातील विस्तारित भागातील वाणी प्लॉट, कथले प्लॉट, कॅन्सर हॉस्पिटल परिसर, पंकज नगर भागातील रहिवाशांना पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. या पाण्याच्या टाकीमुळे येथील रहिवाशांना उच्च दाबाने, चांगल्या प्रकारे पाणी पुरवठा होण्यासाठी मदत होणार आहे.सुभाष नगर भागातील ब्रिटिश कालीन ३० लक्ष लिटर्स क्षमतेच्या हौदाजवळ पूर्वी अस्तित्वात असलेल्या पंप गृहामध्ये ४० अश्वशक्तीचे दोन पंप पॅनल व इतर साहित्य बसवून पंप गृह ते या उंच टाकी दरम्यान टाकण्यात आलेल्या पाईप लाईन द्वारे या विस्तारित भागातील नागरिकांना पाणी पुरवठा केला जाणार आहे.यावेळी नगराध्यक्ष ॲड. आसिफभाई तांबोळी, माजी नगराध्यक्ष रमेश पाटील, नगरसेवक विलास आप्पा रेनके, प्रशांत कथले, बापूसाहेब वाणी, बाळासाहेब लांडे, सुभाष लोढा, उपनगराध्यक्ष कृष्णराज बारबोले, पक्षनेते विजय नाना राऊत, पाणी पुरवठा सभापती संतोष भैय्या बारंगुळे, जलदाय अभियंता अजय होनखांबे, नगरसेवक दीपक राऊत, कय्युम पटेल, आण्णासाहेब लोंढे, नागजी दुधाळ, अमोल चव्हाण, ॲड. महेश जगताप, विजय चव्हाण, काकासाहेब फुरडे, इमरान मुल्ला, संदेश काकडे, उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या