श्री गणेश वस्त्रदालन बक्षीस योजनेतील पहिल्या क्रमांकाच्या मारुती अल्टोचे मानकरी अंजनगावचे गणेश पाटील

B1न्यूज मराठी नेटवर्क
क्रांती नाना मळेगावकर यांच्या होम मिनिस्टरने कार्यक्रमाला आणली रंगतबार्शी : येथील व्यापार विश्वामध्ये कापड उद्योगातून सोलापूर,उस्मानाबाद जिल्ह्यातील असंख्य ग्राहकांची पसंती मिळविणार्या श्रीगणेश वस्त्रदालनाच्या भाग्यवान विजेता सोडतीमध्ये पहिल्या क्रमांकाच्या मारुती अल्टो चे मानकरी अंजनगाव चे गणेश पाटील हे ठरले.
याशिवाय दुसर्या क्रमांकाचे बक्षीस हिरो होंडा स्पेलेंडर धसपिंपळगावचे काका धस यांनी पटकावले तर तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस स्कुटी सतिश गायकवाड सारोळे यांना मिळाले चौथ्या क्रमांकाचे टीव्ही हे बक्षीस बार्शी येथील शुभम वरकुटे यांना लाभले तर पाचव्या क्रमांकाचे बक्षीस फ्रिज बार्शी येथील हरी कदम यांना मिळाले.
श्री गणेशा वस्त्रदालनाच्या भाग्यवान विजेता सोडतीचे हे दुसरे वर्ष आहे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी पाणी पुरवठा मंत्री दिलीप सोपल ज्येष्ठ नेते अरुण भाऊ कापसे, न.पा विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे जि प सदस्य श्रीमंत थोरात, काँग्रेस शहराध्यक्ष अँड जीवनदत्त आरगडे,राकेश तातेड, निश्चीत तात्या चेडे आदी मान्यवर उपस्थित होते.श्री गणेश वस्त्रदालनाचे मालक महेश यादव,संतोष जाधवर,गणेश नान्नजकर, बाळासाहेब कामटे यांनी अतिशय कल्पकतेने या कार्यक्रमाचे संयोजन केले होते. या कार्यक्रमाला क्रांती नाना मळेगावकर व बाल कलाकार सह्याद्री मळेगावकर यांच्या होम मिनिस्टर कार्यक्रमाने रंगत आणली या कार्यक्रमाला तालुक्यातील विविध स्तरातील महिलांनी अतिशय आनंदाने दाद देत उस्फुर्तपणे सहभाग नोंदविला या बक्षीस योजनेत लेमन सेट, इस्त्री , मिक्सर ,टेबल फॅन , क्रोकरी, होम थेटर , साऊंड सिस्टीम, डिनर सेट, हॉट पाॅट, अशा तीनशे एक बक्षीसाचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमात विविध कला प्रकार व गुणदर्शनाचे आविष्कार घडवत विजेत्या ठरलेल्या सौ रूचा कुलकर्णी ,सौ आशा साळूखे, ज्योती देवकर ,राणी पालक या मानकरी महिलांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पैठणीचे वितरण करण्यात आले या कार्यक्रमाचे अतिशय दर्जेदार संयोजन व्यवस्थापन करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी संजय (काका) लोखंडे पंचायत समिती सभापती उस्मानाबाद, गजानन नलावडे , जयंत भोसले बालाजी बारकुल आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी श्री गणेश रोड तरुण गणेश मंडळ, याराना ग्रुप,विजय वाघमारे मित्र मंडळ चर्तुभुज गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीता देव यांनी तर आभार संतोष जाधवर यांनी मानले.