बार्शीच्या सहाव्या समतावादी साहित्य संमेलनाध्यक्षपदी दिल्लीचे डॉ. मिलिंद आव्हाड

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

पालकमंत्री दत्तात्रय भरणे करणार संमेलनाचे उद्घाटन

बार्शी : सांस्कृतिक चळवळ, महाराष्ट्र आणि फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ अमर शेख विचार प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने जानेवारीत बार्शी येथे होणाऱ्या सहाव्या समतावादी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे प्रा. डॉ. मिलिंद एकनाथ आव्हाड यांची निवड झाल्याचे दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. मच्छिंद्र सकटे यांनी जाहीर केले.
यावेळी ज्येष्ठ मार्गदर्शक कॉम्रेड तानाजी ठोंबरे, समितीचे अध्यक्ष जयकुमार शितोळे, कार्याध्यक्ष संदीप आलाट, निमंत्रक सुनील अवघडे, उपाध्यक्षा विजयश्री पाटील उपस्थित होते.

जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, दिल्ली येथील साहित्य, संस्कृतीचे गाढे अभ्यासक डॉ. मिलिंद एकनाथ आव्हाड आहे भाषा, साहित्य व संस्कृतीच्या केंद्राचे सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम पाहतात. त्यांचे नवा वसाहतवाद, आत्मचरित्र : संस्कृती जात आणि लिंगभाव दलित साहित्य, यावर विस्तृत लेखन प्रसिद्ध आहे. ‘द लाईफ ऑफ वर्क ऑफ अण्णाभाऊ साठे अ मार्क्‍सशीस्ट, आंबेडकराईट, मोझाइक फाऊंडेशन दलित रायटिंग, अण्णाभाऊ साठे : मार्क्‍सवादातून आंबेडकरवादाकडे हे तीन ग्रंथ प्रकाशित झाले आहेत.

‘डीकु नॅशनलिजम’ या विषयावर डॉ. आव्हाड यांनी केलेली चिकित्सा देशभर गाजली आहे. त्यांनी विविध आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय परिषदांमध्ये सहभाग नोंदवला आहे. त्यांचे विविध विषयांमध्ये लेखही प्रसिद्ध झाले आहेत. डॉ. आव्हाड मानवी हक्क अभियान या सामाजिक चळवळीचे अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. मराठी व इंग्रजी साहित्य विश्वात एक लेखक समीक्षक व विचारवंत म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यांनी युरोप आणि अमेरिका सह विविध राष्ट्रांना भेटी दिल्या आहेत.

संमेलनाचे उद्घाटक म्हणून सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे उपस्थित राहणार आहेत. तर समारोपासाठी प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे उपस्थित राहणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे सामाजिक न्याय मंत्री न्याय मंत्री धनंजय मुंडे उपस्थित राहणार आहेत. यावेळी उमेश पवार, डॉ. लाजवंती राठोड, प्रा. स्मिता सुरवसे, शब्बीर मुलानी, सतीश झोंबाडे, राम नवले, सतीश होनराव आदी उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या