बार्शीत ग्राहक दिना निमित्त कायदेविषयक लोकजागृती

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : बार्शी तहसील आणि अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या वतीने राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त आयोजित उपक्रमात कायदेविषयक लोकजागृती करण्यात आली. तहसीलदार यांच्या दालनात शुक्रवारी दुपारी हा कार्यक्रम पार पडला.
यावेळी अध्यक्षस्थानी निवासी नायब तहसिलदार संजीवन मुंढे, वकील संघटनेचे अध्यक्ष अॅड. अविनाश जाधव, अॅड. भगवंत पाटील, माहिती अधिकार कार्यकर्ते दीनानाथ काटकर, अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे जिल्हा उपाध्यक्ष अॅड. विजय कुलकर्णी, तालुकाध्यक्ष अमर नाकटिळक उपस्थित होते.
अॅड. विजय कुलकर्णी यांनी 2019 च्या सुधारित ग्राहक संरक्षण कायद्याची माहिती दिली, अॅड. अविनाश जाधव यांनी अनेक उदाहरणातून ग्राहकांची होणारी फसवणूक व कायदेविषयक तरतुदी सांगितल्या. काटकर यांनी कायद्याचे ज्ञान असलेले आणि सामान्य नागरिक यांच्यातील दुरावा कमी करून ग्राहकांचे शोषण थांबण्याच्या प्रयत्नांची गरज असल्याची भावना व्यक्त केली. अमर नाकटिळक यांनी स्व.बिंदुमाधव जोशी यांच्या चळवळीविषयी माहिती दिली.
महेश निकम, अमर मुके, विनायक देशपांडे, किरण मक्के, निलेश केसकर, रवींद्र कुटे उपस्थित होते. ऋषिकेश धनवडे यांनी सूत्रसंचालन केले, निवृत्ती लांडगे यांनी आभार मानले.