रातंजन येथे मध्यान्ह भोजन योजनेचे वाटप , महाराष्ट्र शासन कामगार विभागाचा उपक्रम

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : महाराष्ट्र शासन कामगार विभाग सोलापूर यांच्या वर्तीने इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची मध्यान्ह भोजन योजना बार्शी तालुक्यात राबविण्यात येत आहे.ये भोजन प्रत्येक कामगारापर्यत जात आहे. कामगार विभागाची दररोज भोजनाची गाडी सोलापूर हुन येते. या भोजनामध्ये , भात , दोन भाज्या , चपाती , लोंचे, गूळ इत्यादी पदार्थ भोजन योजनेमध्ये मिळतात. अशी माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे सचिव रमेश नागटिळक यांनी माहिती दिली आहे.
बार्शी तालुक्यातील रातंजन येथे बांधकाम कामगार यांना भोजन वाटप करण्यात आले. त्यावेळी बापू नागटिळक , बाबासाहेब नागटिळक , रमेश नागटिळक , मारुती बिले , अरविंद नागटिळक , पिंटू पवार , संतोष साठे , नामदेव नागटिळक , दत्तू माने , खईम काझी , जमाला आत्तार , लक्षमन गाजबरे, विलास हजारे इतर मान्यवर उपस्थित होते.