बार्शीत चक्काजाम आंदोलनावेळी निवासी, नायब तहसीलदारांना आंदोलकांनी बसवले रस्त्यावर
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : ओला दुष्काळ जाहीर करावा व शेतकऱ्यांचे सरसकट कर्जमाफी व्हावी याकरिता बार्शी पोस्ट ऑफिस जवळ संभाजी ब्रिगेडच्या वतीने चक्काजाम आंदोलन पुकारण्यात आले होते हे आंदोलन सुमारे एक तास चालले या आंदोलनामध्ये सरकारनं शेतकऱ्यांच्या कर्जमाफी व ओला दुष्काळ जाहीर करावा, या सह एकूण 17 मागण्या या आंदोलन वेळी करण्यात आल्या या आंदोलनासाठी प्रहार संघटनेच्या संजीवनीताई बानगुडे काँग्रेस अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष वसीम भाई पठाण ज्येष्ठ शेतकरी नाना शिंदे, बालाजी डोईफोडे, विकास बरबोले, जोतिराम शिंदे, विनोद होणकळस, विक्रम घायतिडक, अभिजित मोरे, हनुमंत करडे, पांडुरंग घोलप यांच्या सह मोठया संख्येने शेतकरी उपस्थित होते.
या वेळी संभाजी ब्रिगेड चे जिल्हाध्यक्ष आनंद काशीद यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या वर तोफ डागत सवाल केले, तुम्हीच 2024 च्या निवडणुकीत आश्वासन दिल होत 7/12 कोरा कोरा कोरा हेच आश्वासन पूर्ण करा, त्याच बरोबर सांगली कोल्हापूर पुरावेळी आपण विरोधी पक्ष नेता होता त्या वेळी ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे अशी मागणी केली होती त्या पेक्षा किती तरी अधिक पाऊस मराठवाडा व लगतच्या जिल्यात पडला आहे मग आत्ता ओला दुष्काळ जाहीर करा.
त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्व नुकसान धारकांना भरपाई मिळावी या सह खालील 17 मागण्या केल्या आहेत.
1)शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी 70 हजार रुपये
2)फळबाग धारकांना 1. 5लाख हेक्टरी
3) ज्यांच्या शेतातील माती अथवा ताल वाहून गेली त्यांना हेक्टरी 2.5 लाख
3)ज्यांची जाणवरे वाहून गेली किंवा दगावली त्यांना तातडीने मदत द्यावी
4)ज्यांची घरे पडली किंवा धोकादायक झाली त्यांना तात्काळ प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकुल द्यावे
5)पुरामुळे ज्या ओढ्याचा नदीचा प्रवाह धोक्याचा झाला आहे त्याची उन्हाळ्यात दुरुस्ती किंवा मजबुती करीता आत्ताच मंजुरी द्यावी
6)शेतकरी कर्ज माफी सरसकट करावी
7) नवीन कर्ज कोणत्याही अटी शिवाय द्यावे
8) कर्ज धारक नसणारला शेतकऱ्यांना सहनुग्रह अनुदान द्यावं
9)विद्यार्थीची फी माफ व्हावी
10)बी बियाणे खाते मिळावी
11) पिकांना कायम स्वरूपी हमी भाव मिळावा
12) पूर, अतिवृष्टी मुळे ज्यांचा मृत्यू व आत्महत्या केलेल्याच्या कुटुंबियांना 25 लाख मदत व शासकीय नोकरीत समावेश करावा.
13)शेतमजुरांना व शेती वरती अवलंबून असणाऱ्या भूमीहीनांना दीपावली करता प्रत्येक कुटुंबाला पाच हजाराची मदत करावी.
14) गोवंश पाळण्यासाठी शेतकऱ्यांना गोवंश भत्ता द्यावा
15) पोलुशन टॅक्स द्वारे जमा केलेला कर शेतकऱ्यांनी बांधावरती व शेतामध्ये लावलेल्या झाडांच्या अनुदानावरती खर्च करावा.
16) बार्शी तालुक्यातील इंडियन शुगर इंदरेश्वर शुगर येडेश्वरी शुगर या तिन्ही कारखान्यांची ऊस तोडीच्या नियोजनासाठी लवकर बैठक लावावी.
17) नवीन वीज कनेक्शन मिळत नसल्याने सौर पॅनल संदर्भात बैठक लावून आढावा घ्यावा.
या सह इतर शेतकरी योजनाचा लाभ शेतकऱ्यांना तातडीने द्यावा तरच शेतकरी उभा राहील ही जबाबदारी सरकारने तातडीने पार पाडावी अशी मागणी चक्का जाम आंदोलनात केली. तर या वेळी वसीम पठाण यांनी आम्ही शेतकऱ्या सोबत आहोत त्यांना शक्य ती मदत करू, सरकारने पण भरीव मदत करावी अशी मागणी केली.
तर प्रहार च्या संजीवनी बरंगुळे यांनी फडणवीस साहेब लाडक्या बहिणीला फसवलं आपण आज त्यांची शेती उध्वस्त झाली आहे, तीच कुंकू पुसू लागलं आहे तिकडे लक्ष द्या अन्यथा येणाऱ्या निवडणुकीत तुम्हाला दारात हिच लडकी बहीण रूमन घेऊन उभी राहील या रस्ता रोको आंदोलनाचे निवेदन निवासी नायब तहसीलदार सुभाष बदे यांना रस्त्यावरती बसून देण्यात आले त्यांना देखील रस्त्यावरती आंदोलकांनी बसवले.




