ड्रॅगन पॅलेसला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या निधीतून ग्रीन बस मिळणार
ड्रॅगन पॅलेस मध्ये संविधान प्रतिकृती उभारण्याचा जागतिक विक्रम होणार
B1न्यूज मराठी नेटवर्क
मुंबई , दिनांक 4 : नागपूर मधील ड्रॅगन पॅलेस ला ग्रीन बस घेण्यासाठी ४० लाखांचा निधी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी दिला. या ग्रीन बस द्वारे बौद्ध अनुयायी पर्यटकांना दीक्षाभूमी आणि नागपूर परिसर तसेच बुद्धगया दर्शन सुद्धा करता येईल असे यावेळी सुलेखा ताई कुंभारे यांनी जाहीर केले. या ग्रीन बस साठी आणखी १० लाखांचा निधी देऊन एकूण ५० लाखांची मदत देण्याचे ना. रामदास आठवले यांनी यावेळी जाहीर केले 69 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिना निमित्त नागपूर कामठी येथील सुप्रसिद्ध ड्रॅगन पॅलेस या बुद्ध विहारास रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी भेट दिली.
नागपूर कामठी येथील ड्रॅगन पॅलेस मध्ये जगातील सर्वात मोठ्या आकाराचे भारतीय संविधान ग्रंथ प्रतिकृती उभारण्यात येणार असून त्याची दखल वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंदली जाणार आहे. त्याचा संकल्प जाहीर करताना संविधान प्रतिकृती चे लोकार्पण रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांच्या हस्ते ड्रॅगन पॅलेस मध्ये5करण्यात आले. यावेळी संविधान ग्रंथ वाटप सुद्धा ना. रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी ड्रॅगन पॅलेसच्या प्रमुख सुलेखाताई कुंभारे , संविधान ग्रंथ प्रतिकृती बनविणारे मनीष पाटील आणि रिपाइं युवक आघाडी राज्य अध्यक्ष पप्पू कागदे मान्यवर दयाळ बहादुर बाळू घरडे विनोद थूल राजन वाघमारे आदी अनेक उपस्थित होते.




