पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन बॅडमिंटन स्पर्धेमध्ये बी.पी.सुलाखे कॉमर्स कॉलेजला विजेतेपद
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या वतीने बार्शी येथे श्री शिवाजी महाविद्यालयामध्ये दिनांक २२ सप्टेंबर २०२५ रोजी आंतरमहाविद्यालयीन बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रामधील विविध संलग्नित महाविद्यालयामधील मुलांच्या एकूण १५ संघांनी सहभाग घेतला होता.
सदर स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सांगोला महाविद्यालय सांगोला, फार्मसी कॉलेज सोलापूर, स्वेरी इंजिनिरिंग कॉलेज पंढरपूर च्या संघांचा पराभव करत बी.पी.सुलाखे कॉमर्स कॉलेज बार्शीच्या संघाने अंतिम फेरीत धडक मारली. अंतिम सामन्यात डब्लू.आय.टी कॉलेज सोलापूरच्या संघाचा पराभव करीत बार्शीच्या बी.पी.सुलाखे कॉमर्स कॉलेजच्या संघाने प्रथम क्रमांक पटकविला.
या स्पर्धेमध्ये विजेत्या झालेल्या बी. पी. सुलाखे कॉमर्स कॉलेजच्या संघाला मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी पारितोषिक वितरण समारंभासाठी विद्यापीठाचे वारिष्ठ शारीरिक संचालक डॉ. समर्थ मनुकर, डॉ. वाघचौरे, प्रा. मकरंद भुजबळ तसेच श्री शिवाजी महाविद्यालय बार्शीचे क्रीडा शिक्षक इ मान्यवर उपस्थित होते.
विजेत्या संघाला बी.पी. सुलाखे कॉमर्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. संजय करंडे, शारीरिक शिक्षण संचालक प्रा. रोहित डिसले, कॉमर्स विभाग प्रमुख प्रा. किरण चपटे, आय.क्यु.ए.सी समन्वयक डॉ. बाळासाहेब लांडे, कार्यालयीन अधिक्षक भाऊसाहेब पाटील व सर्व प्राध्यापक वर्ग यांचे मार्गदर्शन लाभले.
बॅडमिंटन स्पर्धेत यश संपादन केल्याबद्दल विजेत्या संघाचे श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. बी वाय. यादव, उपाध्यक्ष नंदनजी जगदाळे, सचिव पी. टी. पाटील, सहसचिव अरुण देबडवार, खजिनदार जयकुमार (बापू) शितोळे, कार्यकारिणी सदस्य, सर्व सदस्य व कॉलेजचे प्राचार्य डॉ. संजय करंडे, कार्यालयीन अधिक्षक भाऊसाहेब पाटील यांनी अभिनंदन करून पुढील आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.




