भूमी अभिलेख, कार्यालय, सोलापूर येथे 29 सप्टेंबरला लोक अदालतीचे आयोजन

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

सोलापूर, दिनांक 26 : जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख सोलापूर यांच्या वतीने अपील प्रकरणांच्या निपटारा करण्यासाठी दि. येथे 29 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11 ते दुवारी 2 वाजेपर्यंत
जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख कार्यालय, जुने जिल्हाधिकारी कार्यालय, परिसर,सोलापूर येथे लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

या लोकअदालतीमध्ये प्रलंबित अपील प्रकरणांवर सुसंवादाच्या माध्यमातून न्याय व जलद निर्णय यावर भर दिला जाणार आहे. यासाठी अपीलमधील उभय पक्षकारांमध्ये तडजोड करण्यास मदत करुन सदर अपीले प्रकरणे कायमस्वरुपी निकाली काढणेकामी संबधित अपीलदार / जाबदार किंवा त्यांचे प्राधिकृत विधीज्ञ प्रतिनिधी यांनी आपल्या सर्व आवश्यक कागदपत्रासह व पुराव्यासह उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख, सोलापूर दादासाहेब घोडके यांनी केले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या