राज्यस्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेचे उद्घाटनमहिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे यांच्याहस्ते संपन्न

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

रायगड-अलिबाग,दि.26 : महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे आणि रायगड जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा क्रीडा संकुल, नेहुली, रायगड-अलिबाग येथील राज्यस्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेचे उद्घाटन महिला व बालविकास मंत्री कु.आदिती सुनील तटकरे, यांच्याहस्ते संपन्न झाले.
यावेळी अपर जिल्हाधिकारी सुनिल थोरवे, जिल्हा व माहिला बाल विकास अधिकारी, निर्मला कुचिक, जिल्हा क्रीडा अधिकारी प्रकाश वाघ यांच्यासह तालुका क्रीडा अधिकारी आणि प्रशिक्षक व खेळाडू उपस्थित होते.

यावेळी महिला व बालविकास मंत्री कु.आदिती सुनील तटकरे म्हणाल्या की, पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला कबड्डी खो-खो टेबल टेनिस हॅण्ड बॉल या स्पर्धांचे आयोजन करायचे आहे, यासाठी जिल्हा नियोजन अंतर्गत विशेष निधी उपलब्ध करून देण्यात येईल. या स्पर्धेसाठी बॉक्सिंग किट उपलब्ध करून दिली असून या स्पर्धेमध्ये मुंबई आणि कोकण विभागातून चार खेळाडू सहभागी होत आहेत.

पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला ही संख्या अधिकाधिक वाढवायची आहे. यासाठी क्रीडा विभागाने अधिकाधिक काम करण्याची आवश्यकता आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये रायगड जिल्ह्यातून आठ खेळाडूंना शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. माणगाव येथे अतिरिक्त विभागीय क्रीडा संकुलासाठी आपण प्रयत्नशील आहोत.

या तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेसाठी राज्यभरातून 252 खेळाडू सहभागी झाले आहेत. जिल्ह्याच्या क्रीडा संकुलाची इमारत ही खेळाडू व क्रिडा विभागासाठी एक अत्यंत महत्वपूर्ण इमारत आहे. क्रीडा विभागाकडून साधारणपणे 15 कोटींचा प्रस्ताव मंत्रालय, स्तरावर पाठविण्यात आला आहे.

जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी असलेली क्रिडा संकुलाची इमारत ही सर्व सोयी-सुविधांनी सुसज्ज असणे गरजेचे आहे. या क्रीडा संकुलात खेळाडूंसाठी चांगल्या पध्दतीची सुविधा निर्माण करुन दिल्या जातील. येथे येणाऱ्या खेळाडूंना राहण्याची व्यवस्था निर्माण करुन दिली जाणार आहे. क्रीडा संकुलात आवश्यक असलेल्या सोयी-सुविधा उपलबध करुन देण्याकरिता जिल्ह्यातील सेवाभावी संस्था, कंपन्याच्या सीएसआर फंडातून निधी उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी प्रकाश वाघ यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलनाने करण्यात आली.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या