अवैध सावकारी बाबत बार्शीतील मुसळे यांच्या घरावर व दुकानावर निबंधक व पोलिसांची मध्यरात्री कारवाई

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : येथील उपळाई रोड नाईकवाडी प्लॉट येथे रहात असलेल्या रंजेश मुसळे व राकेश मुसळे यांच्या राहते घरी व भगवंत मंदिर रोड येथील दुकानावर सहाय्यक निबंधक व बार्शी पोलीस विभागाने अवैद्य सावकारकी अंतर्गत धाड टाकली. अनिल मुरलीधर खाडे रा दत्तनगर बार्शी यांनी मुसळे यांच्या अवैद्य सावकार की बाबत सहाय्यक निबंधक कार्यालय मध्ये तक्रारी अर्ज सादर केला होता
सहाय्यक निबंधक कार्यालयातील सचिन महाडिक व सहा पोलीस निरीक्षक उदार यांच्या संयुक्त पथकाने कारवाई करत मुसळे यांच्या दुकानावर व राहत्या घरी धाड टाकून कागदपत्राची तपासणी केली. कारवाईमध्ये मुसळे यांच्याकडे ७ सही केलेले कोरे चेक ,४ लाखाचा एक चेक , चोवीस हजाराचा एक चेक , ५ कोरे स्टॅम्प , २ कोरे स्टॅम्प ची झेरॉक्स तसेच उसनवारी घेतलेल्या पैशाच्या पावतीच्या झेरॉक्स काही जागेचे साठेखत फेरखरेदी बाबतचे पत्र असे अवैद्य सावकारी बाबतची संशयित कागदपत्रे सापडली असून ही सर्व कागदपत्रे सहाय्यक निबंधक कार्यालयातील पथकाने जप्त केली आहेत
याबाबतची पुढील चौकशी अमोल निरडे सहाय्यक निबंधक बार्शी हे करीत आहेत चौकशीमध्ये अवैद्य सावकारी निष्पन्न झाल्यास मुसळे यांच्यावर महाराष्ट्र सावकरी ( नियमन) अधिनियम २०१४ मधील तरतुदीनुसार गुन्हा दाखल करण्यात येईल असेही सहाय्यक निबंधक यांनी सांगितले.
कारवाईसाठी गेलेल्या पथकामध्ये सतीश मोरे ,उमेश मुसळे, सुहास राऊत व बार्शी शहर पोलीस स्टेशन मधील कर्मचारी यांचा समावेश होता.