वैराग नगर पंचायतीचे 77.4 टक्के मतदान; निवडणूक प्रक्रिया शांततेत पूर्ण

वैराग : प्रथमच होत असलेल्या वैराग नगरपंचायतीच्या पंचवार्षीक निवडणूकिसाठी मंगळवार दिनांक 21 रोजी 13 प्रभागासाठी एकूण 11 हजार 107 पैकी 8 हजार 557 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून एकूण 77.04 टक्के मतदान झाले आहे. निवडणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस प्रशासनाच्या वतीने पोलीस निरीक्षक विनय बहिर यांचे मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त लावण्यात आला होता.प्रभाग क्रमांक एक : मध्ये 1042 पैकी 830 एवढे ( 79.65 टक्के) मतदान झाले. प्रभाग क्रमांक दोन : 831 पैकी 787 ( 80.18 टक्के) , प्रभाग क्रमांक 4 : मध्ये 896 पैकी 663 ( 74टक्के ), प्रभाग क्रमांक 5 : मध्ये 980 पैकी 710 ( 72.45 टक्के), प्रभाग क्रमांक 6 : मध्ये 1096 पैकी 862 ( 78.65 टक्के ), प्रभाग क्रमांक 7 : मध्ये 849 पैकी 617 ( 72.67 टक्के ), प्रभाग क्रमांक 8 : मध्ये 952 पैकी 781 ( 82.04टक्के ), प्रभाग क्रमांक 11: मध्ये 874 पैकी 697 ( 79.75टक्के ), प्रभाग क्रमांक 12 : मध्ये 861 पैकी 679 ( 78.86 टक्के), प्रभाग क्रमांक 13 : मध्ये 714 पैकी 536 ( 75.07टक्के ), प्रभाग क्रमांक 14 : मध्ये 616 पैकी 434 ( 70.45 टक्के ), प्रभाग क्रमांक 16 : मध्ये 774 पैकी 581 ( 75.06टक्के ), प्रभाग क्रमांक 17 : मध्ये 666 पैकी 536 ( 80.48 टक्के ) अशाप्रकारे एकूण 11 हजार 107 पैकी 8 हजार 557 मतदान झाले असून (77.04 टक्के ) झाले.