आनंद यादव यांची शिवसहकार सेनेच्या जिल्हा संघटक (जिल्हा अध्यक्ष) पदी निवड

B1न्यूज मराठी नेटवर्क
मुंबई : मुख्यमंत्री पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने श्रीमती शिल्पा सरपोतदार यांनी आनंद यादव यांची जिल्हा संघटक पदी निवड केली सोलापूर जिल्ह्याला सहकाराचा फार मोठा वारसा लाभलेला आहे. राज्यात सर्वाधीक साखर कारखाने याच जिल्ह्यात आहेत, सहकारी सुत गिरणी, विविध शेती पुरक उद्योग सहकारी बँका पतसंस्था यांचे खुप मोठे कार्य सोलापूर जिल्ह्यात चालू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात शिवसेनेची भूमिका फार महत्वाची आहे.
राज्याचे मुख्यमंत्री हेच शिवसेना पक्ष प्रमुख असल्याने शिवसेनेच्या सहकार्यशिवाय सोलापूर जल्ह्यातील सहकार क्षेत्रातला गती प्राप्त होणार नाही. त्यामुळे जिल्ह्यातील सहकार क्षेत्राला गती देण्यासाठी बार्शीच्या आनंद यादव यांना शिवसहकार सेनेच्या जिल्हा संघटकपदी नियुक्ती केली.
आनंद यादव हे विजय(बापु) शिवतारे यांचे स्विय सचिव म्हणुन देखील काम पाहिले आहे. त्यामुळे प्रशासकीय अनुभव मोठा आहे. तसेच म.न.से. विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष व शिवसेना वैद्यकीय कक्षाचे तालुका अध्यक्ष म्हणून देखील काम पाहिले आहे. विविध सहकारी संस्था यांचा मोठा अनुभव त्यांना आहे. सहकारी संस्थेत होणारा भ्रष्टाचारास देखील वाचा फोडली आहे. त्यामुळेच सहकारी क्षेत्रात त्याचा असलेला अनुभव पाहून त्यांची निवड केल्यामुळे येणाऱ्या काळात सहकारी संस्था व सहकार क्षेत्रात पक्षाचा विस्तार होण्यास मोलाची मदत होणार आहे.