अपघातग्रस्तांच्या जीव वाचवणाऱ्यांसाठी “जीवनदूत पारितोषक” योजना

0

या योजनेत ५ हजार रुपये रोख व प्रमाणपत्र देऊन गौरव

B1न्यूज मराठी नेटवर्क

सोलापूर : अपघातग्रस्त व्यक्तीच्या जीव वाचवण्यासाठी तातडीने मदत करणाऱ्या नागरिकांचा सन्मान करण्यासाठी केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्रालयामार्फत “जीवनदूत पारितोषक” योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत अपघाताच्या वेळी गंभीर जखमी व्यक्तीस गोल्डन आवर (सुवर्ण तास) मध्ये प्रथमोपचार करून रुग्णालयात पोहोचवणाऱ्या मदत करणाऱ्या व्यक्तीस ५ हजार रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

🛡️ अपघात समयी मदतीसाठी प्रोत्साहन –
मोटार वाहन कायद्यातील सुधारित तरतुदीनुसार, अपघातग्रस्त व्यक्तीस मदत करणाऱ्या नागरिकांची पोलिसांकडून कोणतीही चौकशी केली जाणार नाही. त्यामुळे नागरिकांनी निर्भयपणे मदतीस पुढे यावे, अशा हेतूने ही योजना राबविण्यात येत आहे. अधिकाधिक नागरिकांनी अपघातग्रस्तांचे प्राण वाचवण्यासाठी पुढाकार घ्यावा, यासाठी ही योजना प्रेरणादायक ठरणार आहे.

📜 जीवनदूत म्हणून गौरव मिळवण्यासाठी प्रक्रिया-

मदत करणाऱ्या व्यक्तीने संबंधित रुग्णालयातून अपघातग्रस्त दाखल केल्याचे प्रमाणपत्र घ्यावे

रुग्णालयाने मदत करणाऱ्या व्यक्तीची माहिती संबंधित पोलीस स्टेशनला कळवावी

प्राप्त माहितीच्या आधारे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समिती मदत करणाऱ्या जीवनदूतास पारितोषक मंजूर करेल

🗣️ अधिकृत माहिती-
या योजनेबाबत माहिती देताना उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, अकलूज यांनी पत्रकाद्वारे स्पष्ट केले की, “जीवनदूत योजना ही अपघातग्रस्तांच्या जीव वाचवणाऱ्या नागरिकांना प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात आली असून, समाजात मदतीची भावना वृद्धिंगत करण्याचा यामागे उद्देश आहे.”

ही योजना समाजातील संवेदनशीलतेला चालना देणारी असून, अपघातग्रस्तांना वेळेवर मदत मिळवून देण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या