बार्शी तालुक्यातील VJNT (विमुक्त जाती व भटक्या जमाती) प्रवर्गातील नागरिकांसाठी दाखले शिबिराचे आयोजन
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य अभियानांतर्गत सेवा पंधरवडा साजरा करण्याच्या पार्श्वभूमीवर बार्शी तालुक्यात VJNT (विमुक्त जाती व भटक्या जमाती) प्रवर्गातील नागरिकांसाठी विविध दाखले देण्याचे विशेष शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत.१७ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत तालुक्यातील सर्व गावांमध्ये ग्रामसभांमध्ये हे शिबिरे होणार आहेत.
VJNT जमातीसाठी उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवाशी दाखला, जातीचे प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, रेशनकार्ड, निवडणूक ओळखपत्र, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ निराधार योजना यासारखे दाखले ऑनलाइन जारी केले जातील.
मंडळ अधिकारी आणि ग्राम महसूल अधिकारी यांना त्यांच्या क्षेत्रातील ‘आपले सरकार’ सेवा केंद्रांना लॅपटॉप आणि आवश्यक साहित्यासह शिबिरात उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सेवा केंद्र चालकांनी गावातील ग्रामसभेच्या ठिकाणी हजर राहून दाखले ऑनलाइन करण्याची कार्यवाही करावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे.




