बार्शी येथे वृक्ष प्रेमींचा स्नेहमेळावा संपन्न

B1न्यूज मराठी नेटवर्क
परसबाग गच्चीवरील बाग स्पर्धेतील विजेत्यांचा झाला सन्मान
बार्शी : बार्शी मधील शंभुराजे मंगल कार्यालय येथे वृक्ष प्रेमींच्या स्नेह मेळाव्याच आयोजन वृक्ष संवर्धन समिती व जाणिव फाउंडेशन च्या वतीने करण्यात आले यावेळी विविध स्पर्धेचे बक्षिस वितरण तसेच स्नेहभोजन असा कार्यक्रम घेण्यात आला व महिलांचा गौरव करण्यात आला.या वेळी समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या महिलांच्या परसबाग व गच्चीवरील बाग स्पर्धा तसेच लहान मुलांच्या पत्रलेखन स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान मान्य वरांच्या हस्ते करण्यात आला.शहरातील वृक्षचळवळ आनखी व्यापक करण्यासाठी महिलांनाही या चळवळीत सहभागी करण्यासाठी परसबाग व गच्चीवरील बाग स्पर्धेचा प्रेरक उपक्रम बार्शीत घेण्यात आला होता . वृक्षसंवर्धन समिती व जाणीव फाऊंडेशन यांनी संयुक्तपणे घेतलेल्या या उपक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन सामाजिक कार्यकर्ते अजित कुंकूलोळ तर प्रमुख पाहुणे म्हणुन उद्योजक प्रशांत पैकेकर, लेखक सचिन वायकुळे, उद्योजक गौतम कांकरिया, आरोग्य अधिकारी शब्बीर वस्ताद , प्रा. शशिकांत धोत्रे, उमेश पवार, वनविभागाचे साळुंखे व माझी वसुंधराचे गणेश पाटिल आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना अजित कुंकुलोळ यांनी दोन्ही समित्यांच्या कार्याच कौतुक केले. तसेच सचिन वायकुळे आपल्या भाषणात म्हणाले की वृक्षांची चळवळ ऑक्सिजन वाढविणारी जशी आहे, तशीच ती शहराचे सौंदर्य खुलवणारीही आहे, याची जाणीव ठेवत गेल्या साडे तीन वर्षांपासून वृक्षसंवर्धन समिती व जाणीव फाऊंडेशन यांनी काम सुरु केले. सतत नवे उपक्रम राबवत असताना प्रत्येक घटकाला यात सामावून घेता यावे यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत. आणि यातूनच महिलांसाठी परसबाग व गच्चीवरील बाग स्पर्धा घेण्यात आली होती.याचवेळी वृक्षसंर्धन समितीच्यावतीने यंदा प्रथमच काढलेल्या वृक्षसंर्धन दिनदर्शिकेचे प्रकाशन उद्योजक प्रशांत पैकेकर यांच्या हस्ते करण्यात आले.विशेष म्हणजे सर्व उपयुक्त माहिती युक्त हि दिनदर्शिका लोकाना मोफत स्वरुपात देण्यात येणार आहे.या नंतर खालील विजेत्यांचा ट्रॉफी व सन्मान पत्र देवुन सन्मान करण्यात आला.
: परस बाग स्पर्धेत कावेरी बागुल, अपूर्वा चव्हाण, स्नेहा मदने, अनीता मोटे, उमा विभुते तर गच्ची बाग स्पर्धेत वृंदा केसकर, निर्मला पाटील, जयश्री अंधारे, अंजली कुलकर्णी, प्रतिज्ञा वायकुळे यांचा परितोषिक देऊन गौरव करण्यात आला. पत्रलेखनात भक्ती कुलकर्णी, श्वेता खोसे, शिवदास भगत, वैभवी महाकर, समृध्दी चौधरी, गायत्री सातारकर या विजेत्यांना सत्कार करण्यात आला. वृक्षसंवर्धन समितीने केलेल्या आवाहनानुसार संक्रातीला वाण म्हणून रोपे वाटप केल्याबद्दल रुपाली पोतदार, राहीणी पोतदार, अॅड. राजश्री डमरे-तलवाड, सुलक्षणा नलावडे, गौरी काळे, अश्वीनी गुंड, अर्चना खुने यांचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणारे एड अनंत मस्के, नाना शिंदे, राणा देशमुख , हर्षद लोहार,सतिष देशपांडे या वृक्षसंर्धन सदस्यांचा आणि वृक्ष संवर्धन समिती चे अध्यक्ष उमेश काळे यांचा वाढदिवसानिमित्त प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी वसंत हवालदार, डॉ. सचिन चव्हाण, डॉ. विनायक हागरे,उमेश नलावडे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक अतुल पाडे यांनी केले सुत्रसंचालन संतोष गायकवाड व उदय पोतदार यांनी केले. शेवटी संतोष पवार यांनी आभार व्यक्त केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सतीष देशपांडे,हर्षद लोहार, हरीदास मस्के, राणा देशमुख, दिपकनाना शिंदे, सचिन शिंदे, राहुल तावरे, एड.अनंत मस्के, डॉ.प्रशांत मांजरे, संतोष मस्के, संपतराव देशमुख, राजाभाऊ लोहार, संतोष मस्के, काका मस्के, अक्षय घोडके, राहुल काळे, किशोर अकोसकर, दिपक पाटिल, नाना मारकड, संदिप ढेंगळे, बाबासाहेब बारकुल, सौदागर माने, आबा माने, डि.जे,शशी पोतदार, अमित पाटिल, महेश बकशेट्टी, गणेश रावळ या वृक्षसंर्धन समिती व जाणीव फाऊंडेशनच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.