ओंकारच्या उपचारार्थ लोकराजा संस्थेनं दिली आर्थिक मदत

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : येथील लोकराजा बहुउद्देशिय सामाजिक संस्थेच्या वतीने कोरफळ्यातील ओंकार ढावारे या मुलाच्या उपचारासाठी आर्थिक मदत देण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष धिरज भोसले यांनी आपल्या वडिलांच्या माजी सैनिक भागवत भोसले स्मृतीप्रीत्यर्थ सदर मदत शंकर पाटील यांचेकडे सुपुर्द केली.यावेळी सनी गायकवाड, महेश निंबाळकर, बाळासाहेब शिंदे, समीर ठाकरे, रणजित माने, धनाजी बरडे, शंकर पाटील, बाबा ठाकरे, तुकाराम बरडे, सुधीर बरडे, दत्ता भोगे उपस्थित होते.
यावेळी बोलताना धिरज भोसले म्हणाले की वडिल सैन्यदलात सेवेत होते. देशसेवेबरोबर सामाजिक दातृत्वही जपलं होतं. त्यांच्या १० व्या स्मृतिनिमित्त समाजातील गरजूंना मदत करुन सेवेचा वसा व वारसा पुढे न्यावा, या जाणीवेतून ही मदत दिली. भविष्यातही ओंकारच्या दवाखान्यासाठी व शिक्षणासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रम यशस्वितेसाठी सनी गायकवाड,प्रसन्नजित नाईकनवरे , तोसिफ बागवान , संतोष गुंड , अंदमान गायकवाड, किरण मक्के, आदींनी परिश्रम घेतले.