बार्शी वकीलसंघाच्या अध्यक्षपदी ॲड. अविनाश जाधव तर उपाध्यक्षपदी ॲड. भगवंत पाटील यांची निवड , सचिवपदी नरेंद्र घोडके विजयी

B1न्यूज मराठी नेटवर्क
मागील दोन वर्षांपासून कोरोना संसर्गामुळे बार्शी वकील संघाची निवडणूक झाली नव्हती यावर्षी झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत बार्शी वकील संघाचे अध्यक्षपदी ॲड. अविनाश जाधव, उपाध्यक्षपदी भगवंत पाटील, सचिवपदी नरेंद्र घोडके हे विजयी झाले आहेत.
खजिनदार ,लायब्ररी चेअरमन व मॅनेजमेंट कमिटी सदस्य चार पदाधिकारी प्रत्येकी एक अर्ज आलेला होता त्यामुळे या पदासाठी अविरोध निवड झाली आहे अशी माहिती मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी ॲड. विकास जाधव यांनी सांगितले ॲड. सुनील कुलकर्णी , ॲड शंकर ननवरे, लायब्ररियन ॲड. अक्षय रानमाळ यावेळी उपस्थित होते.
बार्शी बार असोसिएशन च्या सन 2021-22 निवडणुकीसाठी खालील प्रमाणे आहेत-
अध्यक्षपदासाठी उमेदवार
१) गणेश मधुकर काळे
२) पद्माकर बिभीषण काटमोरे
३) रत्नमाला के.पाटील
४) शिवाजी आर. जाधवर
५) अविनाश हौसेराव जाधव
६) काकासाहेब दत्तू गुंड
यांच्यात लढत झाली ॲंड अविनाश जाधव हे १२ मताधिक्य मिळवून विजयी झाले.
उपाध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणूकीत अॅड अजय शिवाजी भुसारे, अॅड उषा नंदकुमार पवार,
अॅड .विशाल दिलीप गोणेकर, अॅड भगवंत शिवाजी पाटील यांच्यात लढत झाली अॅड .भगवंत पाटील यांना 34 मताधिक्य मिळवून विजयी झाले. सचिवपदासाठी झालेल्या निवडणुकीत अॅड . इकबाल दस्तगीर पठाण , अॅड .नरेंद्र मधुकर घोडके यांच्यात लढत झाली अॅड घोडके 86 मताधिक्य मिळवून विजयी झाले.
खजिनदरपदासाठी अॅड .अनंत अप्पराव मस्के,लायब्ररी चेअरमनपदी अॅड . अविनाश कोंडिबा गायकवाड ,मॅनेजमेंट कमिटीपदी अॅड . उषा नंदकुमार पवार, अॅड .संजय श्रीराम गुंड, अॅड . धिरज हरी कांबळे , अॅड अक्षय नागनाथ बिडबाग यांची बिनविरोध निवड झाली आहे .