बी.एड. व डी. एल. एड. परीक्षेच्या राखीव निकाल प्रकरणी उमेदवारांनी माहिती सादर करण्याचे आवाहन
Oplus_16908288
B1न्यूज मराठी नेटवर्क
पुणे, दि. १०: बी. एड. व डी. एल. एड. परीक्षेला ६ हजार ३२० उमेदवार प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी ३ हजार १८७ उमेदवारांचा निकाल राखीव ठेवण्यात आला आहे. राखीव निकाल प्रकरणी उमेदवारांनी १५ सप्टेंबर २०२५ पर्यंत www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन दिलेल्या लिंक मध्ये माहिती व अंतिम वर्षास प्रविष्ठ उत्तीर्ण असलेबाबतचा निकालाची प्रत देण्यात यावी. १५ सप्टेंबर नंतर माहिती सादर करणाऱ्या उमेदवारांच्या राखीव निकालाबाबत विचार केला जाणार नाही. याची सर्व विद्यार्थी उमेदवारांनी गांभीर्याने नोंद घ्यावी, असे परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी कळविले आहे.




