आधार सेवा केंद्रांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

अकोला, दि. २ : जिल्‍हाधिकारी कार्यालय,अकोला. अंतर्गत जिल्‍हयातील 35 महसुली मंडळामध्ये “आधार सेवा केंद्र” करिता इच्‍छुक आपले सरकार केंद्र धारकांकडून अर्ज मागविण्‍यात येत आहे. इच्‍छुक अर्जदारांनी संकेतस्‍थळ www.akola.gov.in वरुन विहीत अर्ज डाऊनलोड करुन तत्काळ सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील महसूल मंडळ निहाय रिक्‍त असलेल्‍या केंद्राबाबत माहिती माहिती या कार्यालयाचे संकेतस्‍थळ www.akola.gov.in वर प्रसिध्‍द करण्यात आलेली आहे. यादीत प्रसिध्‍द केलेल्‍या महसुली मंडळाकरिताच अर्ज सादर करावेत. अर्जदाराकडे जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रदान केलेले आपले सरकार सेवा केंद्र कार्यान्वित असणे अनिवार्य आहे.

आपले सरकार केंद्र चालक स्वतः एनएसईआयटी सुपरवायझर परीक्षा उत्तीर्ण असावा अर्जासोबत आधार, एनएसईआयटी सुपरवायझर प्रमाणपत्र जोडणे अनिवार्य आहे. आधार संच व आधार केंद्र मंजूर झाल्यानंतर आवश्यक कीट महाआयटी यांच्यामार्फत मिळत असल्याने त्यांचे निर्देशानुसार 50 हजार रु. बँक ग्यारंटी फिक्स डिपॉझिट स्वरुपात देणे अनिवार्य राहील.

अर्जदार जर पात्र ठरले तर अर्ज भरते वेळी दर्शविलेल्या महसुली मंडळामध्येच केंद्र सुरु करणे बंधनकारक राहील. ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर भरलेला अर्ज, आधार एनएसईआयटी सुपरवायझर प्रमाणपत्र, जन्म नोंदणी प्रमाणपत्र अथवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, आधार व पॅन कार्ड इतर सर्व तद्नुषंगीक कागदपत्र जोडून अर्ज जिल्हा माहिती तंत्रज्ञान कार्यालय,जिल्हाधिकारी कार्यालय,अकोला येथील अर्ज स्विकृती केंद्रात आणून देणे बंधनकारक राहील. आधार सेवा केंद्राबाबत पात्र/अपात्र उमेदवार यांचे बाबत सर्व माहिती संकेतस्‍थळावर प्रसिध्‍द करण्‍यात येईल.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या