अनुकंपाधारक उमेदवारांच्या रिक्तपदाच्या नियुक्तीसाठी मेळावा संपन्न
B1न्यूज मराठी नेटवर्क
जालना दि.2 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 150 दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत देण्यात आलेल्या एकुण 1 ते 9 टप्यांमधील टप्पा क्र. 5 ( मेळावा घेणे व शिफारस करणे) पूर्ण करण्याच्या अनुषंगाने (दि. 2) आज जिल्हाधिकारी कार्यालय, जालना येथे प्रतिक्षासूचीतील सर्व अनुकंपाधारक उमेदवार यांचा मेळावा घेवुन रिक्तपदांसाठी पसंतीक्रम विहित नमून्यामध्ये घेण्यात आले.
गट-क संवर्गासाठी एकूण 17 पदे रिक्त असून प्रतिक्षासुचीमध्ये 41 अनुकंपाधारक आहेत. या रिक्त पदांवर गट-क संवर्गातील अनुकंपाधारक यांची शैक्षणिक व इतर अर्हतेनुसार नियुक्ती करिता शिफारस करण्यासाठी सदर मेळाव्यामध्ये अनुकंपाधारक यांचेकडुन रिक्त पदाबाबतचा पंसतीक्रम भरुन घेण्यात आला असून, त्यानुसार गट-क संवर्गातील अनुकंपाधारक यांची नियुक्तीसाठी नियुक्ती प्राधिकारी यांचेकडे शिफारस करण्यात येणार आहे.
सुरुवातीस मेळाव्याचे निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल यांनी प्रास्ताविक करुन, मेळाव्याचा उद्देश, प्राप्त रिक्त पदाबाबत माहिती, अनुकंपाधारक यांचे शैक्षणिक अर्हतेबाबतची माहिती तसेच पंसतीक्रम कशाप्रकारे दयावा याबाबत माहिती दिली. अपर जिल्हाधिकारी रिता मेत्रेवार यांनी उपस्थित सर्व अनुकंपाधारक यांचे शंकाचे निरसन करून, त्यांना मार्गदर्शन केले.
या मेळाव्यास उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) सरिता सुत्रावे, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) नम्रता चाटे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) मनिषा दांडगे आदि उपस्थिती होते. अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शशीकांत हदगल यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविली आहे.




