निवेदनबार्शीमहाराष्ट्र

मोहम्मद पैगंबर जयंती निमित्त बार्शी शहर व तालुक्यात ड्राय डे ची बार्शी तहसीलदारांकडे मागणी

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : दिनांक 5/9/2025 दिवशी पैगंबर जयंती निमित्त बार्शी शहर व तालुक्यात ड्राय डे (दारू विक्री बंद) करणेबाबत इलीयास शेख यांनी बार्शी तहसीलदार यांच्याकडे निवेदन दिले आहे.

मोहम्मद पैगंबर यांचे संदेश अखंड मानवजाती साठी उपयुक्त आहे. संपूर्ण जगात व आपल्या भारत देशात मोहम्मद पैगंम्बर व त्यांच्या विचारांना वेगळं अमूल्य स्थान आहे. देशातील सामाजिक क्षेत्रात व रोजच्या सार्वजनिक जीवन जगत असताना त्यांच्या विचारांचा अवलंब केला जातो. त्यांच्या जयंती दिनी विविध सामाजिक उपक्रम राबवून सर्व जाती धर्मातील लोकांचा समावेश करून जयंती साजरी केली जाते.

त्याचप्रमाणे मोहम्मद पैगंम्बर यांनी त्यांच्या विचारात दारू ही हराम केली होती. दारूचे सेवन करू नये असा संदेश त्यांनी दिला. या संदेशाचा मान ठेवत या दृष्टिकोनातून मोहम्मद पैगंम्बर यांच्या जयंतीदिनी आपण ड्राय डे(दारूबंदी) म्हणून घोषित करावा अशा प्रकारची मागणी निवेदनामध्ये करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button