बी पी सुलाखे कॉमर्स कॉलेज बार्शी येथे राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात संपन्न
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : बी पी सुलाखे कॉमर्स कॉलेज बार्शी , येथील आय.क्यू. ए. सी., एन.एस.एस. व शारीरिक शिक्षण विभाग याद्वारे राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात पार पडला. महाविद्यालयातील वरिष्ठ व कनिष्ठ विभागामधील बी कॉम, एम कॉम, बी सी ए विद्यार्थी तसेच सर्व विभागाचे प्राध्यापक व महाविद्यालयाचे कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमांमध्ये सहभाग नोंदविला.
अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. डॉ. एस बी करंडे व कार्यक्रमचे प्रमुख व्याखाते म्हणून प्रा. के. आर. देशमुख (पर्यवेक्षक, आर. जी. एस. महाविद्यालय, परंडा), महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. आर एस डिसले, ज्यनिअर विभागाच्या शारीरिक संचालिका सौ आर आर शिंदे, आय. क्यू. ए. सी. समन्वयक प्रा. डॉ. बी डी लांडे, ग्रंथपाल सौ ज्योती यादव,कॉमर्स विभागाचे विभाग प्रमुख प्रा. के बी चपटे, बी.सी ए विभागाचे विभाग प्रमुख प्रा. बी व्ही लिंगे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ एम ए ढगे,प्रा के एम माळी तसेच ज्युनियर विभागाचे समन्वयक प्रा एच डी काळे हे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात कर्मवीर डॉ मामासाहेब जगदाळे व हॉकीचे जादुगार मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करून झाली.प्रास्ताविक महाविद्यालयाचे शारीरिक संचालक प्रा. आर एस डिसले यांनी केले.
कार्यक्रमच्या प्रमुख व्याखाते प्रा. के. आर. देशमुख यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी भारतीय क्रीडा क्षेत्रात मेजर ध्यानचंद यांचे महत्त्वाचे योगदान असल्याचे सांगितले. तसेच विविध शारीरिक क्रियाकलाप आणि क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होऊन विद्यार्थ्यांना त्यांचे स्वतःचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य कसे राखायचे याबद्दल मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय समारोपात, प्रभारी प्राचार्य प्रा. डॉ. एस बी करंडे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला विद्यार्थ्यांनी शैक्षणिक विकसाबरोबर च शारीरिक विकास देखील महत्वाचा आहे असे नमूद केले. तसेच क्रीडा आणि दैनदिन आयुष्य यांचा सहसंबंध विविध पैलूंनी समजावून सांगितला.
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमांचे आयोजन केले होते. या उपक्रमांतर्गत महाविद्यालयातील वरिष्ठ व कनिष्ठ विभागामधील विभागाचे सर्व प्राध्यापक व महाविद्यालयाचे कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांची बीएमआय तपासणी करण्यात आली. शारीरिक आणि मानसिक आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणारे विविध पोस्टर्स भिंतीवर लावण्यात आले होते.
यावेळी महाविद्यालयातील प्रा ए व्ही पवार ,डॉ कापसे डी एन, प्रा. ए.एस.पाटील, प्रा एस.ए .ढेपे,प्रा.घावटे जी.एम.तसेच वरिष्ठ व कनिष्ठ विभागामधील बी कॉम, एम कॉम, बी सी ए विद्यार्थी तसेच सर्व विभागाचे प्राध्यापक व महाविद्यालयाचे कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमांमध्ये उपस्थित होते.कार्यक्रमाचे आभार प्रा सरपाळे यांनी केले.सूत्र संचालन प्रा के एम माळी यांनी केले.




