भटके विमुक्त समाजाचे स्वातंत्र्य चळवळीतील व राष्ट्र उभारणीतील योगदान महत्त्वाचे – ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

सातारा : भटके विमुक्त समाजाचे स्वातंत्र्या चळवळ व राष्ट्र उभारणीतील योगदान लक्षात घेऊन त्यांच्या सन्मानार्थ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वतीने राज्य व जिल्हास्तरावर ३१ ऑगस्ट रोजी ‘भटके विमुक्त दिवस’ म्हणून साजरा केला जात आहे. शासनाने घेतलेला हा निर्णय केवळ प्रतीकात्मक नसून भटके विमुक्त समाजाच्या सामाजिक न्याय, आत्मसन्मान आणि प्रतिष्ठेसाठी एक निर्णायक टप्पा आहे, असे प्रतिपादन ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी केले.

गोंदवले बुद्रुक तालुका माण येथील श्री. संत गाडगे महाराज प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेत ग्रामविकास व पंचायतराज मंत्री श्री. गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत भटके विमुक्त दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमातून या समुदायाचा संघर्ष, योगदान आणि सामाजिक हक्क समाजातील अन्य घटकांपर्यंत पोहोचेल.

शाळेमध्ये भटक्या व विमुक्त समाजाच्या संस्कृतीतील जीवनमूल्ये, परंपरा यांचे दर्शन घडविणारे सांस्कृतिक, शैक्षणिक व माहितीपर उपक्रम राबविण्यात आले आहेत त्याची पाहणी गोरे यांनी करून शाळेतील विद्यार्थ्यांसोबत मुक्त संवाद साधला. इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वतीने शाळेत राबविलेल्या उपक्रमांबाबत विद्यार्थ्यांमध्ये उत्साह उर्जादायी होता.

या कार्यक्रमास प्रांताधिकारी उज्वला गाडेकर, इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहाय्यक संचालक कांचन जगताप, गटशिक्षण अधिकारी लक्ष्मण पिसे, संत गाडगे महाराज आश्रम शाळेचे संचालक सूर्यकांत माने, संचालक शिवाजी महानवर, गोंदवलेचे सरपंच विष्णुपंत कट्टे पाटील, राहुल भोसले यांच्यासह आदी मान्यवर, शिक्षक,विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या