बार्शी तालुक्यातून 2000 पेक्षा जास्त गाड्या जरांगे पाटलांच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी मुंबईला जाणार…. आनंद काशीद
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : तालुक्यातील मराठा समाज सातत्याने मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आग्रही राहिला आहे. मराठा समाज ज्या ज्या वेळी जे जे आंदोलन झाली. त्या त्या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाला आहे. त्या त्या पद्धतीने आंदोलन करून समाजाची मागणी लावून बार्शी तालुक्यातील मराठ्यांनी धरली आहे. मागील वर्षी जानेवारीमध्ये संघर्ष दामोदर पाटील यांनी मुंबईमध्ये आंदोलन केलं होतं.
त्यावेळी देखील बार्शी तालुक्यातील मराठी मोठ्या संख्येने सहभागी होते. त्यावेळी सरकारने मराठ्यांची फसवणूक केली, आणि मराठ्यांना आरक्षणाचा प्रश्न सोडवता प्रलंबित ठेवला याचा राग मराठ्यांना आज देखील आहे. म्हणून मागील एक महिन्यापासून बार्शी तालुक्यातील जवळपास 85 ते 90 गावांमध्ये चावडी बैठका घेऊन मराठा समाजाला मोठ्या संख्येने मुंबईकडे जाण्याचा महत्त्व सांगितल्यामुळे बार्शी तालुक्यातून जवळपास 2000 पेक्षा जास्त गाड्या मुंबईला संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी जात आहेत. अशी माहिती आनंद काशीद यांनी सांगितली.
बार्शी तालुक्यातील चावडी बैठकींना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या चावडी बैठकींना मार्गदर्शन करण्यासाठी युवराज बापू काटे कपिल दादा कोरके विनायक घोडके व आनंद काशीद यांनी समाजाच्या बैठकी घेऊन जागरूक केले.




