जिल्ह्यात आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (AB-PMJAY) आणि महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना (MJPJAY) अंतर्गत विशेष मोहीम
B1न्यूज मराठी नेटवर्क
नंदुरबार : जिल्हा प्रशासनामार्फत दिनांक १६ ऑगस्ट २०२५ ते ३१ ऑगस्ट २०२५ दरम्यान विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. जिल्हा प्रशासनाचे आवाहन आहे की सर्व पात्र नागरिकांनी या कालावधीत आपले व कुटुंबातील सदस्यांचे आयुष्मान भारत गोल्डन कार्ड तयार करून घ्यावेत.
योजनेचे लाभ:
- लाभार्थ्यांना प्रति वर्ष ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार सुविधा.
- या योजनेत १३५६ प्रकारच्या शस्त्रक्रिया व विशेष उपचारांचा समावेश.
- कुटुंबातील ७० वर्षांवरील सदस्यांना अतिरिक्त ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार ‘आयुष्मान भारत वय वंदना कार्ड’ द्वारे उपलब्ध.
आयुष्मान भारत गोल्डन कार्डचे महत्व:
⦁ योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक कुटुंब सदस्याकडे गोल्डन कार्ड असणे बंधनकारक.
⦁ या कार्डशिवाय मोफत उपचारांचा लाभ मिळणार नाही.
गोल्डन कार्ड कुठे व कोणाकडून काढता येईल?
१. स्वतः लाभार्थी
२. आशा स्वयंसेविका
३. आपले सरकार सेवा केंद्र
४. स्वस्त धान्य दुकानदार (राशन दुकानदार)
रेशन कार्ड लिंकिंग:
⦁ ज्यांच्याकडे पिवळे, केशरी, अंत्योदय, अन्नपूर्णा किंवा पांढरे रेशन कार्ड आहे त्यांनी आपले रेशनकार्ड आधार क्रमांकाशी ऑनलाइन लिंक करणे आवश्यक आहे.
⦁ याकरिता रेशन दुकानदार किंवा तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा.
⦁ रेशनकार्ड लिंक झाल्यानंतरच लाभार्थी मोफत आरोग्य विम्यासाठी पात्र ठरतील.
कार्ड कसे काढायचे?
- आपल्या मोबाईलवर Google Play Store मधून आयुष्मान अॅप डाउनलोड करून.
- ऑनलाइन: https://beneficiary.nha.gov.in
- किंवा जवळच्या CSC, आपले सरकार केंद्र, राशन दुकान, जिल्हा प्रशासन, आशा स्वयंसेविकांच्या मदतीने.
आवश्यक कागदपत्रे:
⦁ आधार कार्ड, पत्ता पुरावा, रेशन कार्ड, दोन फोटो, मोबाईल नंबर
जिल्हा प्रशासन, नंदुरबार मार्फत नागरिकांच्या आरोग्य सुरक्षेसाठी मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (AB-PMJAY) आणि महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना (MJPJAY) यांच्या एकत्रित लाभामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना आरोग्याच्या दृष्टीने मोठा आधार मिळणार आहे.
या योजनेमुळे जिल्ह्यातील सामान्य नागरिकांना गुणवत्तापूर्ण व मोफत आरोग्य सेवा उपलब्ध होणार असून, गरिब व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या कुटुंबाला वैद्यकीय खर्चाचा मोठा भार कमी होईल.




