सोलापूर महानगरपालिका नागरिकांसाठी विशेष सवलत योजना – मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी सुवर्णसंधी

0

मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी : ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

B1न्यूज मराठी नेटवर्क

सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांच्या सोयीसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. दि. १ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीत विशेष मालमत्ता कर विभागाच्या वतीने अभय योजना राबविण्यात येणार आहे.

या योजने अंतर्गत, सर्व थकबाकीदार नागरिकांना त्यांच्या मालमत्ता करासोबत असलेल्या व्याज व दंड शुल्कामध्ये १००% सूट देण्यात येणार आहे. म्हणजेच, केवळ मूळ कराची रक्कम भरल्यास व्याज व दंड पूर्णपणे माफ करण्यात येईल.महापालिकेच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की,आपल्या मालमत्ता कराची थकबाकी या विशेष योजनेत तातडीने जमा करावी.आपल्या वेळेवर भरलेल्या करामुळे शहरातील विकासकामांना चालना मिळणार आहे.

महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांनी सांगितले की, “नागरिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेत मालमत्ता कर थकबाकी तातडीने भरावे व वेळेत कर भरणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. कर वसुलीतून जमा होणाऱ्या निधीतूनच शहरातील पायाभूत सुविधा, स्वच्छता व विकासकामे होत असतात. त्यामुळे या विशेष योजनेला नागरिकांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद द्यावा.अहवान आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी केले.

👉 योजनेचा कालावधी : १ सप्टेंबर २०२५ ते ३० सप्टेंबर २०२५
👉 सवलत : व्याज व दंड १००% माफ – केवळ मूळ मालमत्ता कर भरावा लागेल…

सोलापूर महानगरपालिकेच्या सर्व कर संकलन केंद्रांवर तसेच Phonpe, petym, ऑनलाइन प्रणालीद्वारेही कर भरता येईल याची नागरिकांनी नोंद घ्यावी.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या