वाहनांना एचएसआरपी नंबरप्लेट बसविण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ
B1न्यूज मराठी नेटवर्क
यवतमाळ : वाहनांच्या नंबरप्लेटमध्ये छेडछाड व बनावटगिरी करुन होणारे गुन्हे कमी करणे, रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटविणे तसेच राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोनातून वाहनांना एचएसआरपी बसविणे आवश्यक आहे. ही नंबरप्लेट बसविण्यासाठी दि.30 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व वाहनधारकांनी या मुदतीत नंबरप्लेट बसविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्याकरिता परिवहन विभागाने सूचना जारी केल्या आहे. जिल्ह्यात यासाठी संस्थांची नियुक्त करण्यात आली आहे. एचएसआरपी नंबरप्लेट बसविण्याकरिता https://mhhsrp.com हे बुकींग पोर्टल निश्चित करण्यात आले आहे. वाहनधारकांनी या पोर्टलवर बुकींग करुन सोईप्रमाणे अपॉइंटमेंट घेऊन सदर नंबरप्लेट दि.30 नोव्हेंबर पुर्वी बसवून घेण्यात यावी.
एचएसआरपी नंबरप्लेट करीता दुचाकी, ट्रॅक्टर या वाहनांकरिता ४५० रुपये तिनचाकी वाहनांकरिता ५०० रुपये व इतर सर्व वाहनांकरिता ७४५ रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. जिल्ह्यात कुठेही एका ठिकाणी 25 किंवा 25 पेक्षा जास्त दुचाकी, चारचाकी, ऑटोरिक्षा, टॅक्सी, बस, ट्रक मालकांनी एचएसआरपी नंबरप्लेट बसविण्यासाठी अर्ज केल्यास त्यांच्या सोईच्या ठिकाणी किंवा हाऊसिंग सोसायटीमध्ये संबंधित एजन्सी मार्फत कोणतेही अतिरीक्त शुल्क न आकारता एचएसआरपी नंबरप्लेट बसविण्यात येईल, असे उप प्राशिक परिवहन अधिकारी प्रशांत देशमुख यांनी कळविले आहे.




