श्री शिवाजी महाविद्यालयात राष्ट्रीय ग्रंथपाल दिन उत्साहात साजरा
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : पद्मश्री एस.आर. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय ग्रंथपाल दिन श्री शिवाजी महाविद्यालयाच्या यशवंतराव चव्हाण मध्यवर्ती ग्रंथालयात उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. बिरा पारसे तर अध्यक्ष म्हणून प्रभारी प्राचार्य डॉ. शशिकांत गायकवाड हे उपस्थित होते.
प्रास्ताविक करताना ग्रंथपाल प्रा. एम. डी. टिपरसे यांनी राष्ट्रीय ग्रंथपाल दिनाचे प्रयोजन स्पष्ट केले. एस. आर. रंगनाथन यांच्या कार्याचा परिचय करून त्यांची पंचसूत्री विषद केली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा.डॉ. बिरा पारसे यांनी विविध भाषांमधील ग्रंथ व ग्रंथकार यांची माहिती दिली. रंगनाथन यांच्या शैक्षणिक प्रवासाचा आढावा घेवून त्यांनी ग्रंथालयशास्त्रात दिलेल्या योगदानाचे महत्त्व स्पष्ट केले.
डॉ. शशिकांत गायकवाड यांनी यशवंतराव चव्हाण मध्यवर्ती ग्रंथालयाची स्थापना व प्रयोजन यावर विचार मांडले. त्यांनी रंगनाथन यांच्या जीवन व कार्यावर प्रकाश टाकला. त्याचप्रमाणे ग्रंथांनी प्रभावित झालेल्या व घडलेल्या व्यक्तिमत्वांचा परिचय करून देताना महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ग्रंथप्रेम विषद केले. त्यांनी ग्रंथपालाची भूमिका स्पष्ट करून विद्यार्थ्यांकरिता विविध ग्रंथ, विश्वकोश, शब्दकोश यांची उपयुक्तता स्पष्ट केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. राहुल पालके यांनी केले. तर आभार डॉ. विजयकुमार भांजे यांनी मानले. याप्रसंगी प्रा. विजयश्री गवळी, मंजुषा श्रीमंगल मॅडम , सहाय्यक ग्रंथपाल एच.एन. घावटे, जे. वाय. पवार, ग्रंथालयीन कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.




