बार्शी तालुक्यात आढळले दुर्मिळ सिवेल कॅट प्रजातीचे मांजर…
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : आज रोजी बार्शी तालुक्यातील मौजे कळंबवाडी येथील शेतकरी पांडुरंग मुंढे यांच्या शेतात सिवेल कॅट (civel cat) मांजर जखमी असल्याची माहिती वनविभागाला समजली. बार्शी वनविभागाच्या टीमने सदर ठिकाणी जाऊन मांजराची पाहणी करून, जखमी मांजरास ताब्यात घेऊन, पशुवैद्यकीय दवाखाना बार्शी येथे नेऊन त्याच्यावर उपचार करण्यात आले. उपचारानंतर सदर मांजरास रिस्कयु टीम बावधान पुणे येथे पाठवण्यात आले.
या मोहिमेमध्ये गांगरडे साहेब (वनपरीक्षेत्र अधिकारी बार्शी), सुलतान शेख (फ़ॉरेस्ट ऑफिसर बार्शी), सिद्धेश्वर जाधव (वाहन चालक), पांडुरंग मुंढे (शेतकरी) तसेच गावकऱ्यांनी मोलाची कामगिरी केली.
हा सस्तन प्राणी राखाडी किंवा तपकिरी रंगाचा दिसतो. त्याचे शरीर पातळ असते, त्यावर लहान ठिपके आणि पट्टे असतात तसेच त्याला लांब शेपटी असते. सिव्हेट निसर्गात निशाचर असतात. त्यांच्या नेहमीच्या आहारात लहान पक्षी, फळे आणि कीटक खात असतात. सदर मांजर ही लुप्त होण्याच्या मार्गांवर असल्याचे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.




