माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांना जयंतीनिमित्त अभिवादन
B1न्यूज मराठी नेटवर्क
परभणी, दि. 01 : माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
या कार्यक्रमात अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी श्रीमती संतोषी देवकुळे, उपजिल्हाधिकारी श्रीमती संगीता चव्हाण, जिल्हा पुरवठा अधिकारी विलास मुसळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) श्रीमती रेखा काळम, तहसीलदार श्रीमती ज्योती पवार, नायब तहसीलदार श्रीमती शितल कच्छवे, नानासाहेब भेंडेकर यांच्यासह विविध शासकीय अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात स्व. वसंतराव नाईक यांच्या कार्याचा व दूरदृष्टीचा उल्लेख करून त्यांना अभिवादन करण्यात आले. उपस्थितांनी त्यांच्या कार्यापासून प्रेरणा घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी यावेळी केले.




