अनुसूचित जमतीच्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करावे
B1न्यूज मराठी नेटवर्क
सोलापूर दि.01 : महाराष्ट्र शासन, आदिवासी विकास विभाग, अंतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प सोलापूर जि. सोलापूर अधिनस्त असलेल्या सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातील महाविद्यालयीन स्तरावर शिक्षण घेत असलेल्या/ प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जमतीच्या विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रीकात्तर शिष्यवृत्ती योजना, अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण व परीक्षा शुल्क (फ्रिशीप) शिष्यवृत्ती योजना, राज्यातील शासन मान्यताप्राप्त खाजगी विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित शिक्षण संस्थामधील व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काच्या प्रतिपुर्ती योजनेसाठी सन 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी शिष्यवृत्ती अर्ज भरण्याची प्रक्रिया महाडिबीटी पोर्टलवर सुरु झाली आहे.
तसेच सन 2023-24 या शैक्षणिक वर्षासाठी रि-अप्लाय (Reapply) करण्याची मुदत दि. 31 जुलै 2025 पर्यंत वाढविण्यात आलेली आहे. तसेच सन 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी फ्रेश/ रिनीवल (Fresh/ Renewal) अर्ज स्विकारण्याची मुदत दि. 31 जुलै 2025 पर्यंत वाढविण्यात आलेली आहे.
सन 2023-24 व 2024-25 शैक्षणिक वर्षाकरिता अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती अर्ज स्विकारण्याची मुदत दि. 31 जुलै 2025 पर्यंत वाढविण्यात आलेली आहे. तसेच नवीन शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी शिष्यवृत्ती अर्ज स्वीकारण्यास दि. 30 जुन 2025 पासून सुरवात तरी सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातील महाविद्यालयांनी व विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचा अर्ज परिपूर्ण व मूळ कागदपत्रांसह भरण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवरील https://mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन शिष्यवृत्तीचा अर्ज भरुन शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यात यावा असे प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास सागर नन्नवरे यांनी अवाहन केले आहे.




