अखिल भारतीय छावा संघटनेने दिला गटशिक्षणाधिकारी यांना अर्धनग्न आंदोलनाचा इशारा
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी; विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके उपलब्ध करून द्या अन्यथा अर्धनग्न आंदोलन करण्याचा इशारा अखिल भारतीय छावा संघटनेने बार्शी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी बालाजी नाटके यांना लेखी निवेदन देऊन दिला.यावेळी शहराध्यक्ष निलेश पवार,नाना करपे आदी उपस्थित होते.
शाळा सुरू होऊन जवळपास पंधरा दिवस होऊन अद्यापी अनेक शाळांमध्ये पाठ्यपुस्तक मिळाले नाहीत पुस्तक न मिळाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे व यास प्रशासन कारणीभूत आहे. तरी आपण लवकरात लवकर शंभर टक्के विद्यार्थ्यांना पुस्तके उपलब्ध करून द्यावीत अन्यथा दिनांक 10 जुलै 2025 रोजी अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती बार्शी यांच्या कार्यालयामध्ये अर्धनग्न आंदोलन करण्यात येईल व यास प्रशासन जबाबदार असेल असे निवेदनात म्हटले आहे.




