बार्शी : त्वरीत पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी, शरद भालेकर यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

0

B1न्युज मराठी नेटवर्क

बार्शी : सोलापूर जिल्हयातील बार्शी तालुक्यात दिनांक २४ व २५ सप्टेंबर २०२१ रोजी सरासरी पेक्षा जास्त पाऊस झाला. अतिवृष्टीमुळे तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी शिरून शेतातील सर्व फळयागांची व सोयाबिन, तुर, उडिद, मुग, कांदा, मिरची, टोमॉटो, भाजीपाला इत्यादीचे मोठया प्रमाणात नुकसान झाला आहे.

तरी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे सरसकट त्वरीत पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी, मध्यंतरी पावसाचा खंड पडल्यामुळे शेतातील सर्व फळबागांची व सोयाबिन, तुर, उडिद, मुग, कांदा, मिरची, टोमॉटो, भाजीपाला इत्यादीचे मोठया प्रमाणात नुकसान झालेले होते.

त्यामुळे सरकारने २५ टक्के रक्कम जाहिर केलेली होती. ती रक्कम अद्यापही शेतकऱ्यांना मिळालेली नाही. तरी ती रक्कम त्वरीत शेतकऱ्यांना मिळण्यात यावी, या मागणीचे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बार्शी तालुका युवक अध्यक्ष शरद भालेकर यांनी जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या