आधार नोंदणी व आधार दुरुस्तीसाठी केंद्राचा नागरिकांनी लाभ घ्यावा : जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

परभणी : परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालया अंतर्गत असलेले 3 आधार केंद्र व तहसील कार्यालय, परभणी अंतर्गत असलेले 1 आधार केंद्र असे एकुण 4 आधार केद्रांचे परभणी तहसील कार्यालया समोरील हॉलमध्ये आज दि. 14 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते उद्घाटन करुन केंद्र कार्यान्वीत करण्यात आले. आधार नोंदणी व आधार दुरुस्ती केंद्राचा नागरीकांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी यावेळी केले.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, नायब तहसिलदार गणेश चव्हाण, जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक श्री. वाघमारे, संध्या जाधव, विश्वनाथ कनके यांच्यासह केंद्रचालक बालाप्रसाद डागा, अंगद सावंत, नवनाथ लिंगायत, सचिन शेटे यांची उपस्थिती होती.

परभणी शहरातील नागरीकांना नवीन आधार कार्ड, 0 ते 18 वर्ष तसेच 18 वर्षावरील नवीन आधार नोंदणी, नाव, पत्ता, मोबाईल नंबर, जन्मतारीख दुरुस्ती, बायोमेट्रिक फोटो बदलणे, इत्यादी सेवा ह्या या केंद्रामार्फत दिल्या जाणार आहेत. नागरिकांनी त्यांच्या आधार कार्ड बाबतीत वरील समस्या बाबत जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी व तहसील कार्यालय, परभणी अंतर्गत असलेले बालाप्रसाद रामनारायण डागा, अंगद रोहिदास सावंत, नवनाथ लिंगायत व सचिन शेटे आधार केंद्र चालक यांच्याशी संपर्क साधावा.

नवीन आधारकार्ड नोंदणी करण्यासाठी निशुल्क आहे. तसेच फोटो, बायोमॅट्रीक अद्यावत करण्यासाठी रु. 100 शुल्क असणार आहे. नाव, पत्ता मोबाईल क्रंमाक इत्यादी डेमोग्रफिक माहिती अपडेट करण्यासाठी रु. 50 एवढे शुल्क असणार आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या