६८ वा धम्मचक्र प्रवर्तक दिनानिमित्त भव्य खुल्या निबंध स्पर्धेचे आयोजन

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मचक्र प्रवर्तनाच्या ६८ व्या वर्षानिमित्ताने भव्य खुल्या निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी विविध सामाजिक आणि बौद्धधम्म विषयांवर विचारप्रवर्तक निबंध लिहिण्याची संधी स्पर्धकांना दिली आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खालील विषय दिलेले आहेत:

१) २१ व्या शतकातील स्त्री धार्मीक गुलाम आहे का?
२) क्रांतीज्योती सावित्रीमाई फुलेंचे कार्य आजची स्त्री विसरलीय का?
३) बौद्धधम्म परिवर्तनातून काय साध्य केले?
४) खरंच देशाला बौद्धधम्माची गरज आहे का?
५) मी भारताला बौद्धमय झालेला पाहतोय

निबंधाचे नियम:

निबंध कमीत कमी ३०० शब्दांचा असावा.

स्पर्धकांनी आपले नाव, पत्ता व मोबाईल नंबर सुस्पष्टपणे निबंधासोबत द्यावेत.

पारितोषिके:
प्रथम पारितोषीक: रु. ३००१/-
द्वितीय पारितोषीक: रु. २००१/-

तृतीय पारितोषीक: रु. १००१/-

सर्व निबंध पाठविण्याची अंतिम तारीख ११ ऑक्टोबर २०२४ रात्री ९ वाजेपर्यंत आहे. स्पर्धकांनी आपले निबंध अजित कांबळे (मो. 9271590596) यांच्याकडे पाठवावे.

विशेष सूचना:
६ डिसेंबर २०२४ रोजी महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रकाशित होणाऱ्या स्मरणिकेत बक्षिसास पात्र व अपात्र निबंध छापण्यात येणार आहेत. ही स्पर्धा विचारसरणीला चालना देण्याबरोबरच बौद्धधम्माचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.

सर्व इच्छुकांना या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या