१४ वर्षाखालील मुले जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेत सुलाखे हायस्कूलला अजिंक्यपद

0

अंतिम सामन्यात विराट भिसे सामनावीर तर प्रणव जाधवर उत्कृष्ट गोलंदाज

B1न्यूज मराठी नेटवर्क

मोडनिंब : येथे रविवारी (दि.६) पार पडलेल्या मुलांच्या १४ वर्षाखालील जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेत बार्शीच्या सुलाखे हायस्कूल संघाने अकलूजच्या संघावर मात करत जिल्हास्तरावर अजिंक्यपद मिळवले. या विजयासह संगमनेर येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी सुलाखे हायस्कुलचा संघ पात्र ठरला आहे.

नाणेफेक जिंकून कर्णधार विराट भिसे याने गोलंदाजी स्वीकारत अकलूज संघाला ५ बाद ३९ धावांवर रोखले. प्रणव जाधवर विराट भिसे, रत्नेश राऊत, कृष्णा गुळवे, श्लोक वायचळ यांनी उत्कृष्ट गोलंदाजी केली.

प्रत्यत्तरदाखल सुलाखे हायस्कूलचा कर्णधार विराट भिसे व उपकर्णधार प्रणव जाधवर यांनी दमदार सुरुवात केली. त्याला सुशांत शेट्टी व श्रीहर्ष देशमुख यांनी मोलाची साथ दिली. विराट भिसे याने नाबाद १९ धावा काढून संघास विजय मिळवून दिला. त्याला सुशांत शेट्टी ७ धावा, प्रणव जाधवर ५ धावा, श्रीहर्ष देशमुख ३ यांची साथ मिळाली. सुलाखे हायस्कुलच्या संघाने अकलूज संघाचा आठ विकेट व पाच चेंडू राखून पराभव करीत विभागीय स्तरावर प्रवेश मिळविला.

विराट भिसे च्या या खेळीसाठी त्यास ‘मॅन ऑफ दि मॅच’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर प्रणव जाधवर हा उत्कृष्ट गोलंदाज ठरला. बक्षीस वितरण जिल्हा क्रीडा अधिकारी सुनील धारूरकर, उमा विद्यालय मोडनिंब चे श्री लोकरे, एस आर पाटील यांच्या हस्ते पार पडले.

सुलाखे हायकुलच्या संघास कोच सुहास देशमुख, क्रीडा शिक्षक संतोष पवार, सुहास शिंदे, बार्शी तालुका क्रीडा समन्वयक समीर वायकुळे, क्रीडा विभाग प्रमुख प्रमोद माळी, ज्येष्ठ कलाशिक्षक दीपक माने यांचे मार्गदर्शन लाभले.

विजयी संघाचे बार्शी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आनंद सुलाखे, सचिव अनंत कवठाळे, मुख्याध्यापक स्वामीराव हिरोळीकर, उपमुख्याध्यापक रामकृष्ण इंगळे, पर्यवेक्षक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेत शुभेच्छा दिल्या.

विजय संघातील खेळाडू
विराट भिसे, प्रणव जाधवर, श्रीहर्ष देशमुख, श्लोक वायचळ, कृष्णा गुळवे, सुशांत शेट्टी, रत्नेश राऊत, अमित पोकळे, ऋग्वेद देशमुख, शौर्य पाटील, प्रथमेश घोटाळे, वरद चौरे, फरहान मुल्ला, हर्षवर्धन कदम, समर्थ सावळे, गौरव देवधरे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या