भाजप महायुती ला महाराष्ट्राच्या सत्तासिंहासनावर पुन्हा बसविण्याची ताकद माझ्या रिपब्लिकन पक्षात : केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले
B1न्यूज मराठी नेटवर्क
मुंबई,बीड दि. 06 – राज्यासह देशभरात रिपाइं कार्यकर्त्यांची फार मोठी ताकद असुन भाजपाला सत्तेत येण्यासाठी रिपाइंच्या ताकदीची गरज आहे. येणा-या विधानसभेत भाजपाने रिपाइंला 11 जागेवर वाटा देण्याचे काम करावे. भाजप महायुतीला पुन्हा महाराष्ट्राच्या सत्तासिंहसनावर बसविण्याची ताकद माझ्या रिपब्लिकन पक्षाची आहे असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना.रामदास आठवले यांनी केले.
तसेच राखीव मतदार संघातील जागेवर रिपाइंचा हक्क असून केजची जागा देखील रिपाइंच्या हक्काची आहे. भाजप ने केज ची जागा रिपब्लिकन पक्षाला सोडल्यास पप्पू कागदे यांना रिपब्लिकन पक्षाची उमेदवारी देऊ असे यावेळी ना. रामदास आठवले यांनी बीड येथे जाहीर केले. बिड जिल्हा रिपाइंच्या वतीने युवक आघाडी चे प्रदेशाध्यक्ष पप्पु कागदे, यांच्या नेतृत्वात बीड शहरातील छत्रपती संभाजी महाराज क्रिंडागणावर रिपब्लिकन पक्षातर्फे केंद्रीय राज्य मंत्री ना.रामदास आठवले यांचा भव्य- दिव्य सत्कार करण्यात आला या सत्कार सोहळयातस उत्तर देताना ना.रामदास आठवले बोलत होते.
ना. रामदास आठवले म्हणाले की, मी केंद्रात तिस-यांदा मंत्री झाल्यामुळे माझे राज्यभर अनेक सत्कार सोहळे झाले. परंतु बीड जिल्हयाचे पप्पु कागदे यांनी माझा सत्कार सोहळा भव्य दिव्य केला. बौध्द, मातंग ,चर्मकार, मराठा, मुस्लिम समाजाला न्याय देण्याचे काम करणारे आम्ही आहोत. संविधानासाठी गोरगरीब समाजासाठी व उपाशी पोटी राहणा-या माणसांसाठी आम्ही काम करणारी माणसे आहोत. दलित पँथरपासुन बीड जिल्हा माझा बालेकिल्ला आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे ही माझी मागणी दलित पँथरपासुन आहे. मंडल आयोग लागु करण्यासाठी संघर्ष करण्याचे काम मी पॅथरच्या माध्यमातुन केले आहे. नामांतराच्या लढयात गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन यांचे मोठे योगदान होते. मराठा समाजाच्या पाठीशी आम्ही आहोत.
भाजपाने रिपाइंच्या राज्यभरातील ताकदीचा विचार करुन भाजपाने आम्हाला सत्तेत वाटा दिला पाहिजे. भाजपला सत्तेत यायचे असेल तर रिपाइंला 11 जागा देऊन त्यात केज मतदार संघाची जागा द्यावी. मराठा समाजाला आरक्षण मिळवुन देण्यासाठी दिवंगत विनायकराव मेटे यांनी सदैव संघर्ष केला. बीड जिल्हयात आल्यावर गोपीनाथ मुंडे व प्रमोद महाजन यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. पप्पु कागदे सारख्या देशभरातील कार्यकर्त्यांची माझ्या पाठीशी ताकद आहे.