धनगर समाजाचे एसटी प्रवर्गामध्ये आरक्षण मिळावे म्हणून रस्ता रोको आंदोलन

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : तालुक्यातील मालवंडी येथे सकल धनगर समाजाच्या वतीने धनगर समाजाला एसटी प्रवर्गामध्ये आरक्षण मिळावे, यासाठी मालवंडी येथील बस स्थानका च्या चौकामध्ये रस्ता रोको आंदोलन करण्यात करण्यात आले होते. गेले 70 वर्षापासून धनगर समाजाची मागणी असलेल्या एसटी प्रवर्गामध्ये धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी समाजाच्या वतीने वर्ष नव वर्ष गल्लीपासून दिल्लीपर्यंत अनेक मोर्चे आंदोलने रस्ता रोको करण्यात आलेले होते.

तरीही सरकारला जाग येत नाही म्हणून अभी नही तो कभी नही हे ब्रीद वाक्य घेऊन धनगर समाजाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज आंदोलने करण्यात आली आहेत धनगर समाजाच्या वतीने अनेक समाज बांधव उपोषणाला बसलेले आहेत. तरीही सरकार दखल घेत नाही, म्हणून या सरकारने दखल घेऊन सकल धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे म्हणून मालवंडी येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. यावेळी येळकोट येळकोट जय मल्हार अहिल्यादेवी चा विजय असो आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं अशा घोषणा देण्यात आल्या यावेळी जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत थोरात सुनील सलगर संतोष थोरात यांनी समाजाबद्दल मनोगत व्यक्त केले.

यावेळी श्रीमंत थोरात म्हणाले की धनगर समाजाला आरक्षण नाही मिळाले तर पुढील काही काळात यापेक्षा तीव्र आंदोलन करून सरकार वरती दबाव आणून धनगर समाजाला प्रवर्गातून मिळवल्याशिवाय राहणार नाही. यावेळी हनुमंत होनमाने पांडुरंग सलगर सोमनाथ थोरात शशिकांत पाटील हरिभाऊ बिडकर हनुमंत कानडे विठ्ठल पांढरे उद्धव करे आधी धनगर समाजातील बांधव उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या