वृक्ष संवर्धन समितीने केली सार्वजनिक वाचनालयाची स्वच्छता

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : बार्शीतील वृक्ष लागवड आणि संवर्धन चळवळीचे आद्य प्रवर्तक वायुपुत्र नारायण बाबा जगदाळे यांच्या जयंती निमित्त वृक्ष संवर्धन समिती मार्फत शहरातील दीडशे वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या ऐतिहासिक सार्वजनिक वाचनालयाची स्वच्छता केली.

सर्व स्वच्छता झाल्यानंतर वायूपुत्र बाबांना आदरांजली वाहण्यात आली.या वेळी प्रा. शशिकांत धोत्रे, माजी शिक्षण अधिकारी विष्णूपंत कांबळे तसेच वाचनालयाचे अध्यक्ष अशोक सावळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी सर्वांनी वृक्ष संवर्धन समिती च्या कार्याचे कौतुक केले.बाबांच्या आठवणी ला उजाळा दिला. यावेळी रिलायन्स गॅस पॉईंट चे सरव्यवस्थापक पवनकुमार देशमुख, टेक्निकल हायस्कूल चे मुख्याध्यापक टकले सर हे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ.प्रा.सचिन चव्हाण यांनी केले प्रस्ताविक वृक्ष संवर्धन समिती चे अध्यक्ष उमेश काळे यांनी केले तर आभार सचिन मस्के यांनी मानले. या स्वच्छता उपक्रमात योगेश गाडे, दीपक जाधव, चंद्रकांत बुगडे,दादा गवळी, उदय पोतदार, मोहम्मद शेख, महेश बकशेट्टी,हमने सर, रतीकांत हामने,अक्षय भुईटे,प्रवीण गटकुळ,ग्रंथपाल आशिष चौधरी,सचिन यादव तसेच ध्यास कोचिंग क्लास चे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या